समांथाने सेटवरच नवऱ्यासोबत साजरी केली होळी, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:37 IST2026-03-05T15:34:55+5:302026-03-05T15:37:41+5:30

समांथाने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

Samantha Celebrated Holi With Her Husband Raj Nidimoru On The Maa Inti Bangaaram Sets Funny Video Goes Viral | समांथाने सेटवरच नवऱ्यासोबत साजरी केली होळी, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

समांथाने सेटवरच नवऱ्यासोबत साजरी केली होळी, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि निर्माती समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या 'मां इंटी बंगारम' (Maa Inti Bangaaram) या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकताच होळीचा सण जगभरात उत्साहात साजरा झाला आणि या उत्साहाचे रंग समांथाच्या चित्रपटाच्या सेटवरही पाहायला मिळाले. समांथाने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.
 
शुटिंगदरम्यान, छोटासा ब्रेक मिळताच समांथाने तिची टीम आणि मित्रमंडळींसोबत होळीचा आनंद लुटला. या व्हिडीओमध्ये समांथा, तिचा पती राज निदिमोरू आणि दिग्दर्शिका बी. व्ही. नंदिनी रेड्डी एकमेकांवर पाण्याचे फुगे फेकून धम्माल करताना दिसत आहेत. समांथाने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "ढिशक्यांव... 'मां इंटी बंगारम'च्या सेटवरुन सर्वांना शुभेच्छा".


समांथाने यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे, 'मां इंटी बंगारम' हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या भूमिकेबद्दल आणि चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना समांथा म्हणाली, "हा चित्रपट एका अशा महिलेची कथा आहे. जिची ताकद तिच्या धैर्याइतकीच तिच्या संवेदनशीलतेतून येते. हा एक 'स्लाइस ऑफ लाइफ' धाटणीचा कौटुंबिक चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना भावनिक स्तरावर नक्कीच आवडेल".

Web Title : सामंथा ने सेट पर पति संग मनाई होली; मजेदार वीडियो वायरल

Web Summary : सामंथा रुथ प्रभु ने 'मां इंटी बंगारम' के सेट पर पति राज निदिमोरू और निर्देशक बी. वी. नंदिनी रेड्डी के साथ होली मनाई। अभिनेत्री ने पानी के गुब्बारों से मस्ती करते हुए एक मजेदार वीडियो साझा किया। फिल्म 15 मई, 2026 को रिलीज होने वाली है।

Web Title : Samantha Celebrates Holi with Husband on Set; Fun Video Viral

Web Summary : Samantha Ruth Prabhu celebrated Holi on the set of 'Maa Inti Bangaaram' with her team, including her husband, Raj Nidimoru, and director B. V. Nandini Reddy. The actress shared a fun video of their water balloon fight. The film is set to release on May 15, 2026.