ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर १'चं पोस्टर प्रदर्शित, चित्रपट कधी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:25 IST2025-07-07T13:24:15+5:302025-07-07T13:25:49+5:30

'कांतारा'चा प्रीक्वल येतोय! कधी प्रदर्शित होणार चित्रपट ?

Rishab Shetty Movie Kantara Chapter 1 New Poster Released On His Birthday | ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर १'चं पोस्टर प्रदर्शित, चित्रपट कधी येणार?

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर १'चं पोस्टर प्रदर्शित, चित्रपट कधी येणार?

Rishab Shetty Birthday  Kantara Chapter 1 Poster Release: प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता ऋषभ शेट्टीचा आज वाढदिवस आहे. ७ जुलै १९८३ रोजी कर्नाटकातील कुंडापुरा येथे जन्मलेला ऋषभ ४२ वर्षांचा झाला आहे. या खास प्रसंगी अभिनेत्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट निर्मात्यांनी दिली आहे. आज ऋषभ शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी 'कांतारा: चॅप्टर १'चं एक भव्य पोस्टर रिलीज केलं आहेत. 

'कांतारा: चॅप्टर १'च्या पोस्टरमध्ये अभिनेता खूपच भयंकर लूकमध्ये दिसत आहे. हे पोस्टर येताच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये ऋषभ हातात शस्त्र घेऊन खूपच आक्रमक लूकमध्ये दिसत आहे. 'कांतारा: चॅप्टर १' हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋषभच्या 'कांतारा' चित्रपटाचा प्रीक्वल आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा'ने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनातही कायमची जागा मिळवली होती.  हा चित्रपट भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरही चर्चेचा विषय ठरला होता. या यशानंतर 'KGF' आणि 'सालारसाठी ओळखल्या जाणाऱ्या होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: चॅप्टर १' नावाने या सिनेमाचा प्रीक्वल जाहीर केला होता. या प्रीक्वलची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 


 'कांतारा: चॅप्टर १'चं शुटिंग हे पुर्ण झाल्याची माहिती आहे. निर्मात्यांनी 'कांतारा: चॅप्टर १'साठी एक जबरदस्त युद्ध दृश्य शूट केलं आहे, ज्यात ५०० हून अधिक प्रशिक्षित योद्धे, ३००० लोकसंख्या आणि देश-विदेशातील टेक्निकल तज्ज्ञ सहभागी होते. हे भव्य दृश्य तब्बल २५ एकर क्षेत्रात उभारलेल्या सेटवर ४५ ते ५० दिवसांपर्यंत शूट करण्यात आलं, जे भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठ्या सीन्सपैकी एक मानलं जात आहे.  'कांतारा: चॅप्टर १' येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सर्वात मोठा सिनेमॅटिक अनुभव घेण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.  
 

Web Title: Rishab Shetty Movie Kantara Chapter 1 New Poster Released On His Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.