रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 16:09 IST2025-09-06T16:08:41+5:302025-09-06T16:09:27+5:30

रश्मिका मंदाना नुकतीच 'साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स(SIIMA) मध्ये सहभागी झाली होती.

Rashmika Mandanna wears diamond ring engagement to Vijay Deverakonda Rumors abound | रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) दोघंही लोकप्रिय कलाकार आहेत. रश्मिका आधी साऊथ आणि आता हिंदीतही प्रसिद्ध झाली आहे. विजय देवरकोंडाच्या चार्मिंग लूकवर तरुणाई फिदा आहे. रश्मिका आणि विजयने 'गीता गोविंदम','डिअर कॉम्रेड' या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. गीता गोविंदम पासून त्यांच्या रिलेशनशिपलाही सुरुवात झाली अशी नेहमीच चर्चा होते. अद्याप दोघांनीही नातं कबूल केलेलं नाही मात्र आता सर्वांपासून ते लपूनही राहिलेलं नाही. आता नुकतंच रश्मिकाच्या बोटात डायमंड रिंग पाहून विजयसोबत तिची एंगेजमेंट झाली का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

रश्मिका मंदाना नुकतीच 'साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स(SIIMA) मध्ये सहभागी झाली होती. दुबईत हा अवॉर्ड सोहळा होता. डिझायनक साडीत ती खूप सुंदर दिसत होती. यानंतर ती एअरपोर्टवर गेली. दोन्ही ठिकाणी तिच्या बोटातील अंगठीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नेटकऱ्यांनी तिची एंगेजमेंट झाल्याचा अंदाज लावायला सुरुवात केली.


रश्मिकाच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत 'विजयचाही हात एकदा बघा त्यानेही अंगठी घातलीये का','बधाई हो, फायनली','रश्मिका आणि विजय एंगेज?' अशा कमेंट्स यायला सुरुवात झाली.

रश्मिका मंदाना आगामी 'थामा' सिनेमात दिसणार आहे. तर विजयचा नुकताच 'किंगडम' सिनेमात रिलीज झाला. दोघंही करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहेत. लग्नाच्या चर्चांवर त्यांनी कायमच मौन पाळलं आहे. 

Web Title: Rashmika Mandanna wears diamond ring engagement to Vijay Deverakonda Rumors abound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.