'विरोश'चं फॅन मीट, चाहत्यांसोबत पंगतीत बसून जेवले, विजय-रश्मिकाच्या साधेपणाने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:55 IST2026-03-04T14:54:43+5:302026-03-04T14:55:13+5:30

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना या दोघांचा साधेपणा पाहून चाहते भारावून गेले.

Rashmika Mandanna Vijay Devarakonda Fan Meet After Wedding Hyderabad Reception Details | 'विरोश'चं फॅन मीट, चाहत्यांसोबत पंगतीत बसून जेवले, विजय-रश्मिकाच्या साधेपणाने जिंकली मनं

'विरोश'चं फॅन मीट, चाहत्यांसोबत पंगतीत बसून जेवले, विजय-रश्मिकाच्या साधेपणाने जिंकली मनं

Rashmika Mandanna Vijay Devarakonda Fan Meet : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाचा उत्साह अद्याप ओसरलेला नाही. २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा उरकल्यानंतर, मंगळवारी या जोडप्याने हैदराबादमध्ये आपल्या चाहत्यांसाठी एका खास 'मीट अँड ग्रीट' (Meet and Greet) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

विजय आणि रश्मिकाने प्रत्येक चाहत्याशी हस्तांदोलन केले, फोटो काढले आणि ऑटोग्राफ दिला. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरलं ते म्हणजे रश्मिका आणि विजयचं साधेपण. या दोघांनी स्वतः चाहत्यांना जेवण वाढलं आणि ते चाहत्यांच्या पंगतीत बसून जेवले. याच दरम्यान, रश्मिकाने आपला पती विजयला प्रेमाने स्वतःच्या हाताने घास भरवला. हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर 'विरोश'च्या या केमिस्ट्रीवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

लग्नानंतरच्या पहिल्या फॅन मीटमध्ये रश्मिका अतिशय साध्या साडीत, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र अशा रूपात दिसली. तर विजयने फुलांची नक्षी असलेला कुर्ता परिधान केला होता. या दोघांचा साधेपणा पाहून चाहते भारावून गेले.


आज हैदराबादमध्ये 'रॉयल' रिसेप्शन
उदयपूरमध्ये मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत लग्न केल्यानंतर, आज ४ मार्च रोजी हे जोडपे चित्रपटसृष्टीतील मित्र आणि दिग्गजांसाठी एक भव्य रिसेप्शनआयोजित करत आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार्स उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

Web Title : विजय-रश्मिका ने फैन मीट में जीता दिल, प्रशंसकों संग भोजन किया।

Web Summary : विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना ने शादी के बाद हैदराबाद में एक फैन मीट की मेजबानी की। उन्होंने प्रशंसकों को खाना परोसा और उनके साथ भोजन किया, जिससे उनकी विनम्रता दिखी। पारंपरिक परिधान में रश्मिका और फूलों के कुर्ते में विजय ने सभी को मोहित कर लिया। इंडस्ट्री के दोस्तों के लिए रिसेप्शन की योजना है।

Web Title : Vijay-Rashmika's simplicity wins hearts at fan meet, dine with fans.

Web Summary : Vijay Deverakonda and Rashmika Mandanna hosted a fan meet in Hyderabad post-wedding. They served food and dined with fans, showcasing their humility. Rashmika, adorned in traditional attire, and Vijay, in a floral kurta, charmed everyone. A reception for industry friends is planned.