डोळ्यात आग, हातात बंदूक...; रश्मिका मंदानाच्या आगामी 'मायसा'चा फर्स्ट लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:32 IST2025-12-24T16:29:49+5:302025-12-24T16:32:59+5:30
कशावर आधारित आहे रश्मिकाचा 'मायसा'?

डोळ्यात आग, हातात बंदूक...; रश्मिका मंदानाच्या आगामी 'मायसा'चा फर्स्ट लूक आला समोर
अभिनेत्री रश्मिका मंदाना एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे देत आहे. हिंदी असो किंवा साउथ दोन्ही इंडस्ट्रीत तिचीच चर्चा आहे. 'पुष्पा २', 'सिकंदर', 'अॅनिमल' आणि नुकताच तिचा साउथमध्ये 'द गर्लफ्रेंड' रिलीज झाला. आता रश्मिकाला पुन्हा एकदा दमदार अंदाजात पाहायला मिळणार आहे. तिच्या आगामी 'मायसा' सिनेमातील पहिला लूक समोर आला आहे.
रश्मिका मंदानाच्या बहुप्रतिक्षित 'मायसा' सिनेमाची पहिली झलक आली आहे. डोळ्यात आग, धारदार नजर, हातात बंदुक, चेहऱ्यावर रक्त असा तिचा खतरनाक लूक आहे. हा सिनेमा इलेक्ट्रिफाइंग अनुभव देणारा असणार आहे. दमदार ओपनिंग नरेशनसोबत रश्मिकाला 'मायसा' म्हणून प्रेझेंट केलं जाणार आहे. जळत्या जंगलाचा सीन आणि त्यासोबत चालणारा जबरदस्त बॅकग्राऊंड स्कोर मिळून एक अतिशय तीव्र आणि प्रभावशाली माहोल बनवणारा हा सिनेमा आहे.
हा एक हाय ऑक्टेन इमोशनल अॅक्शन थ्रिलर आहे. गौंड समाजाचं सांस्कृतिक स्वरुप दाखवणारा हा सिनेमा आहे. रश्मिका यामध्ये एकदम नव्या अवतारात दिसणार आहे. यामध्ये ती गौंड महिलेची भूमिका साकारत आहे ज्यामध्ये राग, तीव्र भावना, ताकद दाखवण्यात येईल. तिची ही भूमिका न केवळ दमदार आहे पण भावनापूर्णही आहे. सिनेमा प्रेक्षकांवर नक्कीच छाप सोडेल अशी आशा मेकर्सने व्यक्त केली आहे.
'मायसा'चं दिग्दर्शन रवींद्र पुल्ले यांनी केलं आहे. तर अनफॉर्म्युला फिल्म्सने सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाची कहाणी आदिवासींची असल्याने त्यांच्याच परिसरात सिनेमाचं शूटही झालं आहे.