लग्नाच्या चर्चेदरम्यान रश्मिका मंदान्ना मुंबई विमानतळावर स्पॉट, 'या' कृतीने वेधलं चाहत्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:06 IST2026-02-03T13:05:05+5:302026-02-03T13:06:13+5:30
रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे.

लग्नाच्या चर्चेदरम्यान रश्मिका मंदान्ना मुंबई विमानतळावर स्पॉट, 'या' कृतीने वेधलं चाहत्यांचं लक्ष
दाक्षिणात्य सिनेसृष्टीची 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदान्ना सध्या तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. विशेषतः तिच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. अशातच रश्मिकाला आज मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. यावेळी तिने मास्क लावून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरी तिच्या एका कृतीने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे.
एअरपोर्टवर रश्मिका अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने मास्क लावलेला होता, मात्र तिच्या बोलक्या डोळ्यांमधून तिचे स्मितहास्य स्पष्ट जाणवत होते. गाडीत बसण्यापूर्वी रश्मिकाने काही वेळ थांबून आपल्या एका चाहत्याला ऑटोग्राफ दिला. रश्मिकाच्या या साधेपणाचे आणि 'डाऊन टू अर्थ' स्वभावाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदान्ना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघेही लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचे दावे केले जात आहेत. काही वृत्तांनुसार, विजय आणि रश्मिका २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्नबंधनात अडकतील. मात्र, रश्मिकाने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच एअरपोर्टवर मास्क लावून वावरणाऱ्या रश्मिकाचा हा व्हिडिओ आणि फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.