रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, हैदराबादमध्ये 'या' दिवशी होणार शाहीसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:40 IST2026-02-16T17:40:16+5:302026-02-16T17:40:57+5:30
रश्मिका आणि विजयच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. या पत्रिकेत त्यांच्या लग्नाच्या तारखेपासून रिसेप्शनपर्यंतची माहिती आहे.

रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, हैदराबादमध्ये 'या' दिवशी होणार शाहीसोहळा
साऊथचे स्टार कपल असलेल्या विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वीच रश्मिका आणि विजय यांनी गुपचूप साखरपुडा केला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ते लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. आता रश्मिका आणि विजयच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. या पत्रिकेत त्यांच्या लग्नाच्या तारखेपासून रिसेप्शनपर्यंतची माहिती आहे.
सोशल मीडियावर रश्मिका-विजयचं वेडिंग कार्ड व्हायरल झालं आहे. यानुसार साऊथचं हे कपल येत्या २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यांचा लग्नसोहळा हैदराबादमध्ये पार पडणार असून अगदी मोजक्याच लोकांना याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. तर ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये संध्याकाळी ७ वाजता त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार असल्याची माहिती या वेडिंग कार्डमध्ये आहे. यामध्ये असं म्हटलं गेलंय की "एक आनंदाची बातमी आणि आमच्या आयुष्यातील या खास क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहोत. आमच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद आणि त्यांच्या प्रेमाने रश्मिका आणि मी २६ फेब्रुवारीला लग्न करत आहोत. तुमची उपस्थिती आणि आशीर्वाद आम्हाला आवश्यक आहेत. बुधवार, ४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता कृष्णा बंजारा हिल्स हैदराबाद येथे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे".

सोशल मीडियावर व्हायरल झालेलं रश्मिका-विजयचं हे वेडिंग कार्ड ऑफिशियल आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र ते २६ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याच्या चर्चा याआधीही रंगल्या होत्या. त्यांना लग्नबंधनात अडकलेले पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत.