'विरोश'चं लग्न! अखेर रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाची प्रेमाची कबुली, म्हणाले- "आमच्या लग्नाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 09:00 IST2026-02-23T08:59:27+5:302026-02-23T09:00:20+5:30

रश्मिका-विजयने त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलेलं नव्हतं. अखेर आता रश्मिका आणि विजयने सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली. पोस्ट शेअर करत लग्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

rashmika mandanna and vijay deverakonda shared post confirm wedding | 'विरोश'चं लग्न! अखेर रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाची प्रेमाची कबुली, म्हणाले- "आमच्या लग्नाला..."

'विरोश'चं लग्न! अखेर रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाची प्रेमाची कबुली, म्हणाले- "आमच्या लग्नाला..."

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा या साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलच्या लग्नाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यांनी गेल्या वर्षी गुपचूप साखरपुडा केल्यानंतर रश्मिका-विजयच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या. त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. मात्र रश्मिका-विजयने त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलेलं नव्हतं. अखेर आता रश्मिका आणि विजयने सोशल मीडियावरुन प्रेमाची कबुली दिली. पोस्ट शेअर करत लग्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

रश्मिका आणि विजयने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी लग्न करत असल्याचं सांगत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. "आमच्या प्रियजनांनो, आम्ही कोणताही प्लॅन करण्यापूर्वी, आम्ही स्वतःसाठी काही निवडण्यापूर्वी, तुम्ही आमच्यासोबत होतात. तुम्ही खूप प्रेमाने आम्हाला 'विरोश' हे नाव दिलंय. म्हणून आज, खूप प्रेमाने आम्ही आमच्या लग्नाला एक नाव देतोय. 'विरोश'चं लग्न. इतक्या प्रेमाने आमच्या पाठिशी कायम उभं राहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही नेहमीच आमच्यासोबत राहाल. खूप प्रेम", असं रश्मिका आणि विजयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा येत्या २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. रश्मिका-विजयचं लग्न हे एक प्रायव्हेट सेरेमनी असणार आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडणार आहे. त्यांच्या लग्नात कोणत्याही सेलिब्रिटींना आमंत्रित केलेलं नाही. तर रश्मिका-विजयच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी नो फोन पॉलिसी असेल. त्यांनतर ४ मार्चला हैदराबादमध्ये त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन असणार आहे. 

Web Title : रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा ने 'विरोश' शादी की घोषणा की!

Web Summary : रश्मिका और विजय ने आधिकारिक तौर पर अपने रिश्ते और आगामी शादी की घोषणा की। इसे 'विरोश की शादी' कहते हुए, जोड़े ने अपने प्यार और समर्थन के लिए प्रशंसकों को धन्यवाद दिया। 26 फरवरी को एक निजी समारोह की योजना बनाई गई है, जिसके बाद रिसेप्शन होगा।

Web Title : Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Announce 'ViRosh' Wedding!

Web Summary : Rashmika and Vijay officially announced their relationship and upcoming wedding. Calling it 'ViRosh's wedding,' the couple thanked fans for their love and support. A private ceremony is planned for February 26th, followed by a reception.