फॅमिली फोटो! राम चरणने मकर संक्रांतीचा सण कुटुंबासोबत केला साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:01 PM2024-01-15T18:01:23+5:302024-01-15T18:05:51+5:30

दाक्षिणात्य अभिनेता राम चरणच्या पत्नीने सोशल मीडियावर मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आहे. 

Ram Charan celebrated Makar Sankranti with his family | फॅमिली फोटो! राम चरणने मकर संक्रांतीचा सण कुटुंबासोबत केला साजरा

फॅमली फोटो! राम चरणने मकर संक्रांतीचा सण कुटुंबासोबत केला साजरा

आज देशात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. देशभरात विविध ठिकाणी विविध नावांनी हा सण साजरा केला जातो. या सणाचा आनंद सिनेतारकांच्या घरीही पाहायला मिळतो. दाक्षिणात्य अभिनेता राम चरणच्या पत्नीने सोशल मीडियावर मकर संक्रांतीच्या सेलिब्रेशनची एक झलक शेअर केली आहे. 

सुपरस्टार राम चरणने आपल्या कुटुंबासोबत बंगळुरुमध्ये संक्रांत साजरी केली. उपासनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये राम चरण, राम चरणचे वडील चिरंजीवी, अल्लू अर्जुन, अल्लू अर्जुनचे आई-वडील, वरुण तेजा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसत आहेत. यावेळी प्रत्येकजण पांढऱ्या आणि लाल रंगाचे पोशाख परिधान करताना दिसत आहे. उपासनाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मकर संक्रांतीच्या शुभेच्छा'.

राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच  'गेम चेंजर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची राम चरणचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यात राम चरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. शिवाय रवीना टंडनची लेक राशा थडानीही राम चरणसोबत तेलुगू सिनेमातून डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. तर सलमान खानच्या  'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात त्याने कॅमिओ केला होता. 

Web Title: Ram Charan celebrated Makar Sankranti with his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.