रामाच्या नावावरुन ठेवलं लेकाचं नाव अन् मुलीच्या नावात देवी; राम चरणच्या जुळ्या मुलांची नावं फारच खास, सांगितला अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:31 IST2026-02-13T11:31:22+5:302026-02-13T11:31:46+5:30
Ram Charan Son and Daughter Name: कन्या आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याने राम चरण आणि उपासना यांचा आनंद गगनात मावत नाहीये. आता राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांचं बारसं केलं आहे. त्यांनी आपल्या मुलांची नावं फारच खास ठेवली आहेत.

रामाच्या नावावरुन ठेवलं लेकाचं नाव अन् मुलीच्या नावात देवी; राम चरणच्या जुळ्या मुलांची नावं फारच खास, सांगितला अर्थ
साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल असलेले राम चरण आणि उपासना यांनी काही दिवसांपूर्वीच आनंदाची बातमी दिली होती. ३१ जानेवारीला उपासनाने जुळ्या मुलांना जन्म दिला. कन्या आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याने राम चरण आणि उपासना यांचा आनंद गगनात मावत नाहीये. आता राम चरण आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांचं बारसं केलं आहे. त्यांनी आपल्या मुलांची नावं फारच खास ठेवली आहेत.
शिवराम नावाचा अर्थ (ShivRam Name Meaning in Marathi)
व्हरायटी इंडियाशी बोलताना राम आणि उपासना यांनी त्यांच्या मुलांची नावे आणि त्याचा अर्थ सांगितला. राम आणि उपासना यांनी त्यांच्या जुळ्या मुलांची नावे देवावरुन ठेवली आहेत. मुलाचं नाव शिवराम तर मुलीचं नाव अनवीरा देवी असं ठेवलं आहे. याबद्दल राम म्हणाला, "आमच्या मुलांचं बारसं करणं हा अध्यात्मिक निर्णय होता. उपासनाने आणि मी यावर चर्चा केली. पण आमचे आईवडीलही यात सहभागी होते. आमच्या संस्कृती मोठ्यांचे आशीर्वाद आणि ज्ञान याला महत्त्व आहे. आम्ही मुलाचं नाव शिवराम ठेवलं आहे. भगवान राम आणि शिव यांच्या नावावरुन हे नाव ठेवलं आहे. ज्याचा अर्थ संयम असण्यासोबत शक्ति, धर्म आणि भक्ति असा होतो".
अनवीरा नावाचा अर्थ (Anveera Name Meaning in Marathi)
"आम्ही मुलीचं नाव अनवीरा देवी ठेवलं आहे. याचा अर्थ साहस आणि नारी शक्तीचं प्रतिक असा होतो. वीरा म्हणजे वीरता आणि तिच्या नावात आम्ही देवी मुद्दाम टाकलं आहे. शक्ति आणि कृपा असा त्याचा अर्थ. आमच्यासाठी हे नाव म्हणजे शक्ति, प्रेम आणि साहस आहे", असंही त्याने पुढे सांगितलं. राम आणि उपासना यांनी जून २०१२ मध्ये लग्न केलं होतं. त्याआधी अनेक वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. ते एकमेकांचे चांगले मित्रही होते. लग्नानंतर जवळपास ११ वर्षांनी २०२३ मध्ये उपासनाने त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता पुन्हा ते जुळ्या मुलांचे आईबाबा झाले आहेत.