राम चरण आणि कियारा अडवाणीचा बहुप्रतीक्षित 'गेम चेंजर' चित्रपट कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 04:36 PM2024-04-09T16:36:14+5:302024-04-09T16:38:23+5:30

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

Ram Charan and Kiara Advani's political action drama Game Changer release update | राम चरण आणि कियारा अडवाणीचा बहुप्रतीक्षित 'गेम चेंजर' चित्रपट कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

राम चरण आणि कियारा अडवाणीचा बहुप्रतीक्षित 'गेम चेंजर' चित्रपट कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

साऊथ सुपरस्टार आणि RRR फेम राम चरणचा आगामी चित्रपट 'गेम चेंजर' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.  चित्रपटाबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. या चित्रपटात राम चरणसोबत कियारा अडवाणी झळकणार आहे. मोठ्या पडद्यावर राम आणि कियारा यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

रामचरण आणि कियारा अडवाणी स्टारर 'गेम चेंजर' चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अनेक अपडेट्स समोर आले आहेत. याआधी चित्रपटाचे निर्माते दिल राजू यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत एक रोचक खुलासा केला होता. दिल राजू म्हणाले होते की, चित्रपटाची रिलीज डेट जवळपास लॉक झाली आहे. अलीकडेच एका पत्रकार परिषदेत बोलताना दिल राजूने 'गेम चेंजर' पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं होतं. 

आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'गेम चेंजर' हा सिनेमा येत्या ३१ ऑक्टोबर २०२४ ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र,  चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत निर्मात्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.  ऑक्टोबर महिन्यात अनेक मोठे चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकतात. ज्युनियर एनटीआरचा 'देवरा', रजनीकांत यांचा 'वेट्टियाँ'  याच महिन्यात रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तिन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

Web Title: Ram Charan and Kiara Advani's political action drama Game Changer release update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.