रस्त्याच्याकडेला जेवण करताना दिसले रजनीकांत, चाहत्यांना आवडला सुपरस्टारचा साधेपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 09:32 IST2025-10-06T09:31:19+5:302025-10-06T09:32:08+5:30

सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी त्यांचा साधेपणा पाहून चाहते खूप खूश झाले.

Rajinikanth Took Break From Work And Reached Rishikesh Ate Food On Leaf Plate On The Roadside | रस्त्याच्याकडेला जेवण करताना दिसले रजनीकांत, चाहत्यांना आवडला सुपरस्टारचा साधेपणा

रस्त्याच्याकडेला जेवण करताना दिसले रजनीकांत, चाहत्यांना आवडला सुपरस्टारचा साधेपणा

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा चित्रपटांमध्ये जेवढा Larger Than Life अंदाज पाहायला मिळतो, तेवढेच ते खऱ्या आयुष्यात साधे आहेत. इतके मोठे अभिनेते असूनही, ते अतिशय सामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगतात. चाहत्यांना त्यांचा हाच साधेपणा आवडतो. याचाच प्रत्यय चाहत्यांना पुन्हा एकदा आला आहे. सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी त्यांचा साधेपणा पाहून चाहते खूप खूश झाले.

रजनीकांत यांनी त्यांच्या व्यस्त कामातून ब्रेक घेत उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे आध्यात्मिक सहल केली आहे. ऋषिकेश भेटीदरम्यानचा रजनीकांत यांचा एक फोटो खूप चर्चेत आहे. या फोटोत ते एका सामान्य माणसाप्रमाणे रस्त्याच्या कडेला ताटात जेवण करताना दिसत आहेत.  तर त्यांची गाडी त्यांच्या मागे उभी असलेली दिसत आहे. 

 रजनीकांत यांनी ऋषिकेशमधील स्वामी दयानंद आश्रमाला भेट दिली आणि स्वामी दयानंद यांना श्रद्धांजली वाहिली. आश्रमात थांबले असताना त्यांनी गंगा घाटावर ध्यान केले आणि गंगा आरतीत देखील भाग घेतला. या भेटीदरम्यानचे त्यांचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात ते आश्रमातील लोकांशी संवाद साधताना आणि एका पुजाऱ्यासोबत पूजा करताना दिसत आहेत. यानंतर ते द्वारहाटला रवाना झाले.

रजनीकांत यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते नुकतेच लोकेश कनागराज यांच्या 'कुली' चित्रपटात दिसले होते. जो १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. आता ते लवकरच नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित 'जेलर २' मध्ये दिसणार आहेत, ज्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

Web Title : रजनीकांत सड़क किनारे भोजन करते दिखे, सादगी ने जीता दिल।

Web Summary : सुपरस्टार रजनीकांत हाल ही में ऋषिकेश की आध्यात्मिक यात्रा के दौरान सड़क किनारे भोजन करते दिखे। उनकी सादगी ने प्रशंसकों का दिल जीत लिया। तस्वीरें वायरल हो गईं। उन्होंने आश्रम का दौरा किया और गंगा आरती में भाग लिया। रजनीकांत जल्द ही 'जेलर 2' में दिखाई देंगे।

Web Title : Rajinikanth's simplicity wins hearts as he dines roadside.

Web Summary : Superstar Rajinikanth, known for his simplicity, was recently spotted dining roadside during a spiritual trip to Rishikesh. Photos of the actor went viral, highlighting his down-to-earth nature. He also visited an ashram and participated in Ganga Aarti. Rajinikanth will next be seen in 'Jailer 2'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.