रजनीकांत यांच्या 'जेलर २'मध्ये शाहरुख खानची एन्ट्री? मिथून चक्रवर्तींनी दिली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:47 IST2025-12-25T15:46:47+5:302025-12-25T15:47:59+5:30
'जेलर २' मध्ये हिंदी कलाकारांचीही रेलचेल

रजनीकांत यांच्या 'जेलर २'मध्ये शाहरुख खानची एन्ट्री? मिथून चक्रवर्तींनी दिली हिंट
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा आहे. 'जेलर २'मध्येही रजनीकांत यांचा धाँसू अवतार बघायला मिळणार आहे. दरम्यान सिनेमात काही हिंदी चेहरेही दिसणार आहे. सिनेमात मिथुन चक्रवर्ती आणि विद्या बालन असणार अशी बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. तर आता 'जेलर २'मध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचीही एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.
२०२३ साली 'जेलर'सिनेमा रिलीज झाला होता. त्याचवर्षी शाहरुख खाननेही सलग तीन हिट सिनेमे देऊन दमदार कमबॅक केलं होतं. पठाण, जवान आणि डंकी या सिनेमांमुळे शाहरुखने २०२३ वर्ष गाजवलं होतं. तेव्हाच साउथमध्ये रजनीकांत यांच्या 'जेलर'नेही कमाल केली होती. आता 'जेलर २'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत असलेले मिथून चक्रवर्ती यांनी मोठी हिंट दिली आहे. ते म्हणाले, "जेलर २ ची कहाणी मला खूप आवडली. या सिनेमात अनेक अनुभवी कलाकार पाहायला मिळणार आहेत. मोहनलाल, शाहरुख खान, रम्या कृष्णन, शिव राजकुमार..." मिथून चक्रवर्तींनी ही नावं घेत शाहरुख खानची एन्ट्री कन्फर्मच केली आहे.
दरम्यान 'जेलर २'मध्ये शाहरुखच्या एन्ट्रीबद्दल आणि भूमिकेबद्दल मेकर्सकडून अधिकृत अपडेट आलेलं नाही. शिव राजकुमार यांनी जेलर २ चं शूट सुरु केल्याची माहिती याआधी दिली होती. त्यांचा यामध्ये कॅमिओ नाही तर मोठा रोल असणार आहे. त्यामुळे आता शाहरुखची सिनेमात काय भूमिका असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे. तसंच शाहरुख आणि रजनीकांत हे दोन सुपरस्टार्स एकत्र दिसतील यामुळे चाहते खूश आहेत. नेल्सन दिलीपकुमार सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.