थिएटरमध्ये फ्लॉप, पण ओटीटीवर सुपरहिट! 'या' स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाची सगळीकडे होतेय चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:21 IST2026-02-25T17:20:38+5:302026-02-25T17:21:30+5:30
१४४ मिनिटांचा हा एक फ्लॉप चित्रपट आहे, जो ओटीटीवर कमाल करत आहे.

थिएटरमध्ये फ्लॉप, पण ओटीटीवर सुपरहिट! 'या' स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाची सगळीकडे होतेय चर्चा!
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट चर्चेत नसणे अशक्यच. मात्र, दोन वर्षांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा एक 'स्पोर्ट्स ड्रामा' बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. आता मात्र, हाच चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून एक 'मस्ट वॉच' थ्रिलर बनला आहे.
तर तो चित्रपट आहे 'लाल सलाम'. जेव्हा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, नुकताच हा चित्रपट जिओ हॉटस्टार (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ओटीटीवर आल्यापासून या चित्रपटाच्या कथेची आणि रजनीकांत यांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. १४४ मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
हा केवळ खेळ दाखवणारा चित्रपट नसून यात सामाजिक संदेशही दडलेला आहे. चित्रपटाची कथा क्रिकेट आणि दोन धार्मिक समुदायांमधील तणावाभोवती फिरते. राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी धर्माचा वापर करून कशी अशांतता निर्माण करतात, याचे प्रभावी चित्रण यात केले आहे. यात रजनीकांत (मोईुद्दीन भाई) एका तारणहाराच्या रूपात येतात आणि क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.
तगडी स्टारकास्ट
'लाल सलाम' या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत हिने केले आहे. यात रजनीकांत यांच्यासोबत विष्णू विशाल आणि विक्रांत यांच्या मुख्य भूमिका आहेत. जर तुम्हाला खेळासोबतच सामाजिक विषयावर आधारित थ्रिलर पाहायला आवडत असेल, तर 'लाल सलाम' हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.