रजनीकांतचा ‘जेलर’ या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार; कुठे पाहाल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:38 IST2023-09-04T15:36:08+5:302023-09-04T15:38:02+5:30

Jailer : 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार 'जेलर', रजनीकांतच्या चित्रपटाबद्दल जाणून घ्या

rajinikanth jailer movie will be released on 7th september on ott platform | रजनीकांतचा ‘जेलर’ या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार; कुठे पाहाल? जाणून घ्या

रजनीकांतचा ‘जेलर’ या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार; कुठे पाहाल? जाणून घ्या

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करायला सुरुवात केली होती. १० ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एका महिन्याच्या आतच ६०० कोटींचा आकडा गाठण्याच्या जवळ पोहोचला आहे. रजनीकांतचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये गर्दी करत होते. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर आता ‘जेलर’ ओटीटी पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.

रजनीकांतचा ‘जेलर’ ७ सप्टेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘जवान’ हा चित्रपटही याच दिवशी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. अमेझॉन प्राइमने जेलर चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना प्राइम व्हिडिओवर रजनीकांतचा ‘जेलर’ पाहता येणार आहे. चित्रपटातचे दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी ही माहिती दिली आहे. ‘जेलर’ चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ओटीटीवरही तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे.

 

दरम्यान, नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर’ चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. तमन्ना भाटिया, राम्या क्रिश्नन, जॅकी श्रॉफ, मकरंद देशपांडे हे कलकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील ‘का वालिया’ हे गाणंही लोकप्रिय झालं होतं. या गाण्यावरील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Web Title: rajinikanth jailer movie will be released on 7th september on ott platform