सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 09:24 AM2024-03-01T09:24:00+5:302024-03-01T09:26:32+5:30

नुकतेच रजनीकांत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rajinikanth Ditches Luxury To Travel Economy In Viral Video | सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ

सुपरस्टार रजनीकांत यांचा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास, पाहा व्हिडीओ

दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार अर्थात रजनीकांत (rajinikanth) यांच्या अभिनयाविषयी आणि लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगायला नको.  रजनीकांत जिथे जातील, तिथे त्याच्याभोवती गर्दी जमते. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. तर भरपूर संपत्तीही कमावली आहे. पण साधेपणा ते कधीच विसरले नाहीत. सध्या सगळीकडे सुपरस्टार रजनीकांत यांची चर्चा पाहायला मिळतेय. 

नुकतेच रजनीकांत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  रजनीकांत यांनी अलीकडेच फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये (economy class) प्रवास केला आहे. फॅन्सही त्यांचे खूप कौतुक करत आहेत. आपल्यासोबत रजनीकांत  बसलेत म्हटल्यावर विमानातील इकॉनॉमी क्लासचे प्रवासी अगदी क्रेझी  झाले. व्हिडीओमध्ये दिसते की, रजनीकांत हे फ्लाइटमध्ये विंडो सीटवर आरामात बसलेले आहेत. तर चाहते त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढताना पाहायला मिळत आहेत.  आपल्या साधेपणाने लोकांची मने जिंकण्याची रजनीकांत यांची ही पहिलीच वेळ नाही. 

रजनीकांत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच ते अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.  'थलाइवर 170' मध्येही हे दोन सुपरस्टार एकत्र पाहायला मिळणार आहेत. नुकताच त्यांचा 'लाल सलाम' हा सिनेमात रिलीज झाला. 'लाल सलाम' या सिनेमाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या हिने केलं असून या सिनेमात ते कॅमियो रोलमध्ये झळकले.  रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. 

Web Title: Rajinikanth Ditches Luxury To Travel Economy In Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.