'देसी गर्ल' हैदराबादमध्ये पोहोचली, व्हिडीओ शेअर करत महेश बाबूला केलं टॅग; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:58 IST2025-11-05T13:58:02+5:302025-11-05T13:58:59+5:30
'ग्लोबल आयकॉन' प्रियंका चोप्रा मुंबई नाही तर हैदराबादला पोहोचली...काय आहे कारण?

'देसी गर्ल' हैदराबादमध्ये पोहोचली, व्हिडीओ शेअर करत महेश बाबूला केलं टॅग; कारण...
प्रियंका चोप्रा लवकरच दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. एस एस राजामौलींच्या सिनेमात ती महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी तिघांमध्ये ट्विटरवर जोरदार चर्चा रंगली होती. महेश बाबूने ट्विटरवर राजामौलींना टॅग करत सिनेमाची घोषणा कधी करणार असं विचारलं होतं. तसंच आपली देसी गर्ल जानेवारीपासूनच हैदराबादच्या रस्त्यावरील एकानंतर एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते त्यामुळे आता तरी सिनेमाची घोषणा करुया असं तो गंमतीत म्हणाला होता. दरम्यान प्रियंका चोप्रा पुन्हा हैदराबादमध्ये आली आहे. तिने आणखी एक पोस्ट करत महेश बाबूला टॅग केलं आहे.
एस एस राजामौलींच्या या सिनेमाचं टायटल सध्या 'SSMB29' असं सांगितलं जात आहे. दरम्यान प्रियंका चोप्रा अमेरिकेहून भारतात आली आहे. पहाटे ४ वाजता ती थेट हैदराबाद शहरात पोहोचली आहे. हैदराबादच्या रस्त्यावरील व्हिडीओ शेअर करत तिने महेश बाबूला टॅग केलं आहे. सोबत हसणारा इमोजीही शेअर केला आहे.

महेश बाबूने राजामौली आणि प्रियंका चोप्राची ट्विटरवर चेष्टा केली होती. त्यालाच प्रियंकाने पुन्हा एकदा हैदराबादची स्टोरी पोस्ट करत दुजोरा दिला. त्यांच्यातलं मजेशीर संभाषण चाहतेही एन्जॉय करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्नुसार, १५ नोव्हेंबर रोजी सिनेमासंबंधी एक इव्हेंट रामोजी फिल्म सिटीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये सिनेमाची पहिली झलक दाखवली जाऊ शकते. हा इव्हेंट संध्याकाळी ६ वाजता हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येणार आहे. सिनेमातून राजामौली आणि महेश बाबू पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.