"मी नास्तिक, पण आईची श्रद्धा होती" आईच्या अंत्यसंस्कारावरून ट्रोल करणाऱ्यांना प्रकाश राज यांनी झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:29 IST2026-04-02T14:33:02+5:302026-04-02T15:29:36+5:30

मातृशोकात असलेल्या प्रकाश राज यांची 'ती' पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Prakash Raj Hits Back At Trolls Over Mother’s Christian Funeral | "मी नास्तिक, पण आईची श्रद्धा होती" आईच्या अंत्यसंस्कारावरून ट्रोल करणाऱ्यांना प्रकाश राज यांनी झापलं

"मी नास्तिक, पण आईची श्रद्धा होती" आईच्या अंत्यसंस्कारावरून ट्रोल करणाऱ्यांना प्रकाश राज यांनी झापलं

प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या आई स्वर्णलता यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून त्यांच्यावर वयोमानाशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू होते. मात्र, रविवार २९ मार्च रोजी त्यांची राहत्या घरी प्राणज्योत मालवली. सुवर्णलता राज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वतःला नास्तिक म्हणणाऱ्या प्रकाश राज यांनी आईचा अंत्यसंस्कार ख्रिश्चन पद्धतीने केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, या टीकेवर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

प्रकाश राज यांनी आपल्या आईचे अंत्यसंस्कार ख्रिश्चन धर्मानुसार केले. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या एका जुन्या मुलाखतीची क्लिप व्हायरल झाली, ज्यात त्यांनी आपण देवावर विश्वास ठेवत नसल्याचे म्हटले होते. "स्वतःला नास्तिक म्हणवणारा माणूस आईचे अंत्यसंस्कार धार्मिक विधींनी का करतो?" असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला. या टीकेला उत्तर देताना प्रकाश राज यांनी 'X' (ट्विटर) वर लिहिले, "हो, मी देवावर विश्वास ठेवत नाही… पण माझी आई तिच्या देवावर विश्वास ठेवायची. तिला तिच्या श्रद्धेनुसार अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारणारा मी कोण? हाच तो मूलभूत आदर आहे जो आपण एकमेकांना देणे अपेक्षित असते. द्वेष पसरवणारे हे राक्षस कधी तरी हे समजून घेतील का?", असा सवालही त्यांनी केला.

ख्रिश्चन पद्धतीने झाले अंत्यसंस्कार

सुवर्णलता राज यांचं ३१ मार्च रोजी बेंगळुरूमध्ये निधन झालं. त्यांच्यावर चर्चमध्ये विधी पार पाडून सेक्रेड हार्ट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.याआधी प्रकाश राज यांनी आईच्या प्रकृतीबाबत सांगितलं होतं की, त्यांच्या मेंदूत सिस्ट होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची स्मरणशक्ती कमी झाली होती, ज्यामुळे कुटुंबीयांनाही ओळखणं कठीण झालं होतं. 

स्वर्णलता यांच्या पश्चात तीन मुले आहेत, त्यांपैकी प्रकाश सर्वात मोठे आहेत. प्रकाश राज यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या आईच्या संघर्षाचा उल्लेख केला आहे.त्यांच्या यशामागे आईचं मोठं योगदान असल्याचं त्यांनी नेहमीच आवर्जून सांगितलं होतं. प्रकाश राज हे ५ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आहेत. त्यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडसह अनेक भाषांमध्ये २००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Web Title : मां के ईसाई अंतिम संस्कार पर ट्रोल हुए प्रकाश राज, अभिनेता का करारा जवाब।

Web Summary : नास्तिक होने के बावजूद ईसाई रीति-रिवाजों से मां का अंतिम संस्कार करने पर प्रकाश राज की आलोचना हुई। उन्होंने अपनी मां की आस्था का सम्मान करने और नफरत फैलाने वालों की निंदा करते हुए अपने कार्यों का बचाव किया।

Web Title : Prakash Raj trolled for mother's Christian funeral; actor responds sharply.

Web Summary : Actor Prakash Raj faced criticism for performing his mother's funeral according to Christian rites, despite being an atheist. He defended his actions, emphasizing respect for his mother's beliefs and condemning those spreading hate.