बिग बजेट सिनेमात काम करण्यासाठी पूर्वी प्रभासला वाटायची भीती, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:29 IST2025-10-11T17:29:19+5:302025-10-11T17:29:58+5:30

South Actor Prabhas : पॅन इंडिया स्टार प्रभासने 'बाहुबली'सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, जे मोठ्या बजेटमध्ये बनले आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा प्रभास मोठ्या बजेटचे चित्रपट करण्यासाठी संकोच करायचा.

Prabhas used to be afraid of working in big budget films, you will be shocked to read the reason | बिग बजेट सिनेमात काम करण्यासाठी पूर्वी प्रभासला वाटायची भीती, कारण वाचून व्हाल हैराण

बिग बजेट सिनेमात काम करण्यासाठी पूर्वी प्रभासला वाटायची भीती, कारण वाचून व्हाल हैराण

प्रभास 'बाहुबली - द एपिक' या चित्रपटाच्या रिलीजसह ३१ ऑक्टोबर रोजी 'बाहुबली'च्या रूपात मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज आहे. या सिनेमाने प्रभासला पॅन-इंडिया स्टारचा दर्जा दिला. तेव्हापासून त्याने 'कल्की २८९८ एडी', 'सालार: पार्ट १ - सीजफायर', 'राधे श्याम', 'साहो' आणि 'आदिपुरुष' यांसारखे मोठे चित्रपट केले आहेत. 'बाहुबली - द एपिक' हे दोन 'बाहुबली' चित्रपटांचे ३.५० तासांच्या एका लांब चित्रपटात रूपांतरित केलेला सिनेमा आहे. प्रभासने 'बाहुबली'नंतर एकामागून एक मोठ्या बजेटच्या चित्रपटात काम केले आहे, परंतु एक वेळ अशी होती जेव्हा तो मोठ्या चित्रपटांचा भाग होण्यास तयार नव्हता.

'रिपब्लिक'च्या एका रिपोर्टनुसार, प्रभास मोठे बजेटचे चित्रपट करण्यास संकोच करत होता. मीडिया रिपोर्टनुसार, मोठे बजेटचे चित्रपट खूप दबाव घेऊन येतात. त्यांनी सांगितले की, तो लांब शेड्यूलमुळे थकून जायचा. एकदा त्याने 'बाहुबली'साठी २४ तास शूटिंग केले होते. तसेच, एकदा संपूर्ण कास्ट आणि क्रू रामोजी राव स्टुडिओमध्ये दोन महिन्यांसाठी थांबले होते. या लांब शेड्यूलमुळे त्याला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप कमी वेळ मिळत होता, हेच त्याचे मुख्य कारण होते.

प्रभासचे आगामी चित्रपट
प्रभास सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या स्पिरिट चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. याव्यतिरिक्त, तो सध्या ग्रीसमध्ये द राजा साब चित्रपटाच्या गाण्यांवर काम करत आहे, ज्याचे शूटिंगचे फोटो आधीच व्हायरल झाले आहेत. 'राजा साब' ६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज होणार आहे. तसेच, तो हनु राघवपुडी यांच्यासोबत फौजीवरही काम करत आहेत, ज्याचे ६०% काम पूर्ण झाले असून हा चित्रपट पुढील वर्षी १४ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. यासोबतच, प्रभास प्रशांत नीलच्या सालार आणि नाग अश्विनच्या कल्कि या चित्रपटातही झळकणार आहे.

 

Web Title: Prabhas used to be afraid of working in big budget films, you will be shocked to read the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास