प्रतीक्षा संपली, प्रभासच्या 'द राजासाब'ची रिलीज डेट आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:11 IST2025-06-03T13:09:44+5:302025-06-03T13:11:47+5:30
प्रभासच्या बहुचर्चित ''द राजासाब'' सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे.

प्रतीक्षा संपली, प्रभासच्या 'द राजासाब'ची रिलीज डेट आली समोर
Prabhas' The Raja Saab Release Date Revealed: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे मन जिंकलं आहे. जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे. चाहते त्याच्या प्रत्येक सिनेमाची वाट पाहून असतात. गेल्यावर्षी अभिनेता 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला होता. आता आता 'कल्कि 2898 एडी'नंतर प्रभास ''द राजासाब'' (The RajaSaab Movie) मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रभास सध्या ''द राजासाब'' (The RajaSaab) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे.
'द राजासाब' चित्रपटाचं पोस्टर प्रभासनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ज्यामध्ये प्रभासचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला होता. चित्रपटाच्या रिलीज डेटसोबतच अभिनेत्यानं टीझर कधी प्रदर्शित होणार याबद्दलही माहिती दिली आहे. तर येत्या १६ जून रोजी ''द राजासाब'' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर चित्रपट हा वर्षांच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होईल. आता मोठ्या पडद्यावर प्रभासचा ''द राजासाब'' पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.
प्रभासचे 'द राजासाब' चित्रपटाशिवाय आणखी काही खास चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. लवकरच प्रभास 'अॅनिमल' आणि 'कबीर सिंग' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे संदीप रेड्डी दिग्दर्शित 'स्पिरिट' चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. यासोबतचं तो 'कन्नप्पा' द्वारे चाहत्यांना सुखद धक्का देणार आहे. २७ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अभिनेता विष्णू मंचूच्या चित्रपटात प्रभासनं एक छोटीशी भूमिका साकारलेली आहे.