हातात बंदूक आणि डोळ्यात अंगार! यशच्या 'टॉक्सिक'मध्ये 'गंगा' म्हणून 'लेडी सुपरस्टार'ची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:01 IST2025-12-31T12:59:53+5:302025-12-31T13:01:48+5:30
'टॉक्सिक'च्या निर्मात्यांनी एकापाठोपाठ एक सरप्राईज देत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

हातात बंदूक आणि डोळ्यात अंगार! यशच्या 'टॉक्सिक'मध्ये 'गंगा' म्हणून 'लेडी सुपरस्टार'ची एन्ट्री
दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि हुमा कुरैशी या 'टॉक्सिक'मध्ये झळकणार आहेत. त्यांचे पोस्टरही समोर आले आहेत. आता कियारा आणि हुमानंतर 'लेडी सुपरस्टार' नयनताराचा फर्स्ट लूक समोर आला आहे. नयनताराचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निर्मात्यांनी एकापाठोपाठ एक सरप्राईज देत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
नयनताराचा चित्रपटातील पहिला लूक शेअर करण्यात आला. नयनतारा 'टॉक्सिक' मध्ये 'गंगा'ची भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका काळ्या रंगाच्या स्टायलिश हाय-स्लिट गाऊनमध्ये चालत येताना दिसतेय. तिच्या हातात बंदूक आणि डोळ्यात अंगार आहे. तिचा हा किलर लूक पाहून चाहते चित्रपटासाठी अधिक उत्सुक झाले आहेत. नयनताराच्या लूक पोस्टला खूप खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "'अ टॉक्सिक फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स'मध्ये 'गंगा'च्या भूमिकेत नयनताराला सादर करत आहोत". तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट्स करत आहे.
Introducing Nayanthara as GANGA in - A Toxic Fairy Tale For Grown-Ups #TOXIC#TOXICTheMovie
— Yash (@TheNameIsYash) December 31, 2025
@advani_kiara@humasqureshi#GeetuMohandas@RaviBasrur#RajeevRavi#UjwalKulkarni#TPAbid#MohanBKere#SandeepSadashiva#PrashantDileepHardikar#KunalSharma#SandeepSharma#JJPerry… pic.twitter.com/FSiWGo7XeC
कियारा आणि हुमाचे लूकही चर्चेत
'टॉक्सिक'मधील केवळ नयनताराच नाही, तर इतर अभिनेत्रींचे लूकही चर्चेत आहेत. कियारा अडवाणी 'नादिया'च्या भूमिकेत दिसणार आहे. तर हुमा या चित्रपटात 'एलिझाबेथ'ची भूमिका साकारत आहे. तसेच या चित्रपटात तारा सुतारियादेखील झळकणार असल्याची चर्चा आहे. पण, अद्याप त्याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शनाची तारीख
'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शनाची तारीख १९ मार्च २०२६ आहे. 'टॉक्सिक'ची पहिली खास गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या कथेची व्याप्ती फक्त पॅन इंडिया नाही तर जागतिक आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि कन्नडमध्ये एकाच वेळी चित्रित केला जात आहे. तर हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये डब केला जाणार आहे. 'टॉक्सिक' चित्रपट हा ड्रग माफियांच्या पार्श्वभूमीवर आधारित ॲक्शन-पॅक्ड चित्रपट आहे.
