कुठे आहे तुझी हिरोईन?; विजय देवरकोंडाला एकटं पाहून नागार्जुनने केली 'Ex-सूनबाई' समांथाची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 13:21 IST2023-09-04T13:15:16+5:302023-09-04T13:21:15+5:30

विजय देवरकोंडाला पाहून नागार्जुनला त्याच्या 'Ex-सूनबाई'ची आठवण झालीय.

Nagarjuna akkineni asks vijay deverakonda about samantha ruth prabhu in bigg boss telugu | कुठे आहे तुझी हिरोईन?; विजय देवरकोंडाला एकटं पाहून नागार्जुनने केली 'Ex-सूनबाई' समांथाची चौकशी

कुठे आहे तुझी हिरोईन?; विजय देवरकोंडाला एकटं पाहून नागार्जुनने केली 'Ex-सूनबाई' समांथाची चौकशी

नागा चैतन्यपासून विभक्त होऊन समांथाला बरेच दिवस उलटून गेले आहेत. पण आजही सोशल मीडियावर दोघांबाबत वारंवार   चर्चा ऐकायला मिळत असते. नागा आणि समांथाच्या घटस्फोटाची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी परसली होती. ही बातमी  ऐकून चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान 'बिग बॉस ७ तेलुगू'मध्ये कुशी सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेल्या विजय देवरकोंडाला पाहून नागार्जुनला त्याच्या 'Ex-सूनबाई'ची आठवण झालीय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

विजय देवरकोंडा नुकताच कुशी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस ७' तेलुगूच्या मंचावर आला होता. मात्र यावेळी त्यांची को-स्टार समांथा रुथ प्रभू मात्र उपस्थित होता. विजय एकटाच कुशीच्या प्रमोशनसाठी आलेला पाहून बिग बॉस ७ चे होस्ट नागार्जुन यांना 'Ex-सूनबाई' समांथाची आठवण झाली. 
 
 बिग बॉस ७ शोचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नागार्जुन विजय देवरकोंडाला सामंथा रुथ प्रभूबद्दल विचारताना दिसत आहे. नागार्जुन गेल्या अनेक वर्षांपासून तेलुगू बिग बॉसचा होस्ट आहे. विजय देवरकोंडा 'खुशी'च्या प्रमोशनसाठी शोमध्ये आला होता.‘तुझी हिरोइन कुठंय, समंथा?’ असा प्रश्न नागार्जुनने विजयला केला. यावर विजय म्हणाला, ''सध्या समांथा सिनेमाच्या प्रमोशनसाठी तसेच मायोसिटीसवरील उपचारांसाठी अमेरिकेला गेली आहे.'' यावेळी नागार्जुन यांनी विजय आणि समंथाच्या अभिनयाचं कौतुकसुद्धा केलं.

दरम्यान समांथाने‘कॉफी विथ करण’च्या मंचावर तिच्या आणि नागा चैतन्यच्या नात्याबद्दल खुलासा केला होता.नागा चैतन्यने 2017 मध्ये समंथा रुथ प्रभूसोबत लग्न केले. दोघांनी लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते, पण लग्नाच्या चार वर्षातच नागा आणि समंथा यांच्यात मतभेद सुरू झाले आणि त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले
 

Web Title: Nagarjuna akkineni asks vijay deverakonda about samantha ruth prabhu in bigg boss telugu