समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:25 IST2025-10-07T11:24:24+5:302025-10-07T11:25:30+5:30
नागा चैतन्य आणि शोभिता एकमेकांच्या प्रेमात कधी पडले?

समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं पॉवर कपल नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला सतत चर्चेत असतात. समंथाशी घटस्फोटानंतर काही वर्षातच नागा चैतन्यने शोभिताशी लग्न केलं. तेव्हा समंथाच्या चाहत्यांनी प्रचंड टीका केली. मात्र नागा आणि शोभिताने त्याकडे दुर्लक्ष केलं. दोघंही आज सुखाचा संसार करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचा ग्रँड विवाहसोहळा संपन्न झाला. इव्हेंट्समध्ये ही जोडी हातात हात घालून येते आणि भाव खाऊन जाते. मात्र यांची लव्हस्टोरी नक्की कशी सुरु झाली यावर नुकतंच नागा चैतन्यने उत्तर दिलं आहे.
जगपति बाबू यांच्या झी ५ टॉक शोमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता आले होते. तेव्हा नागा चैतन्यने सांगितलं की त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात सर्वात आधी इन्स्टाग्रामवर झाली होती. तसंच याआधी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दोघांनी लव्हस्टोरीचा खुलासा केला होता. २०१८ मध्ये नागार्जुनच्या घरी सर्वात आधी त्यांची भेट झाली होती. मात्र तेव्हा फार बोलणं झालं नाही. त्यांच्या नात्याची खरी सुरुवात २०२२ मध्ये झाली. म्हणजेच नागा आणि समंथाच्या घटस्फोटाच्या एक वर्षानंतर त्यांचं नातं सुरु झालं. शोभिताने नागा चैतन्यला इन्स्टाग्रामवर फॉलो केलं. मग त्यांच्याच गप्पा सुरु झाल्या. तेलुगू भाषेमुळे ते एकमेकांशी जोडले गेले. मग मुंबईत कॉफी डेट आणि भेटीगाठी वाढल्या. ऑगस्ट २०२४ मध्ये नागाने शोभिताला प्रपोज केलं.
नागा चैतन्य म्हणाला, "आम्ही इन्स्टाग्रामवर जास्त कनेक्ट झालो. माझी जोडीदाराशी इन्स्टाग्रामवर ओळख होईल असा मी विचारच केला नव्हता. मला तिचं काम माहित होतं. एक दिवस मी क्लाउड किचनबद्दल पोस्ट केली तेव्हा तिने इमोजी कमेंट केली. मग आमचं बोलणं सुरु झालं आणि आम्ही भेटलो." नागा आणि शोभिताच्या लग्नाला येत्या दोन महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे.