लग्नाआधी नागा चैतन्य आणि शोभिताला समांताने दिल्या शुभेच्छा, शेअर केली पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 16:00 IST2024-12-04T15:59:57+5:302024-12-04T16:00:47+5:30
लग्नाआधी नागा चैतन्य आणि शोभिताला समांताने शुभेच्छा दिल्या आहेत. समांताने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.

लग्नाआधी नागा चैतन्य आणि शोभिताला समांताने दिल्या शुभेच्छा, शेअर केली पोस्ट, म्हणाली...
साऊथ स्टार नागा चैतन्य आणि बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता पारंपरिक पद्धतीने आज लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. लग्नाआधी नागा चैतन्य आणि शोभिताला समांताने शुभेच्छा दिल्या आहेत. समांताने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.
शोभिता धुलिपालाची बहीण समांता धुलिपाला हिने लग्नाच्या विधींमधील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत समांताने तिची बहीण शोभिता आणि नागा चैतन्यला शुभेच्छा दिल्या आहेत. शोभिताच्या पेली कुतुरू या लग्नापूर्वीच्या विधींमधील हे फोटो आहेत. "सगळ्यात सुंदर पेली कुतुरू आणि सगळ्यात प्रेमळ व्यक्तीला चिअर्स...अक्का आय लव्ह यू", असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. त्याने २०१७ मध्ये समांथाशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांतच घटस्फोट घेत ते वेगळे झाले. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य शोभिता धुलिपालाला डेट करत होता. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलेलं नव्हतं. अखेर ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करत नागा चैतन्य आणि शोभिताने त्यांचं रिलेशनशिप कन्फर्म केलं. आता ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.