माधुरीच्या 'मिसेस देशपांडे'चे फॅन आहात? मग हे थ्रिलर साऊथ सिनेमे युट्यूबवर एकदा पाहाच; चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:00 IST2025-12-25T13:57:15+5:302025-12-25T14:00:00+5:30
जर तुम्हाला 'मिसेस देशपांडे' ही वेब सीरिज आवडली असेल आणि अशा थ्रिलर सस्पेन्स वेब सीरिजचे तुम्ही चाहते असाल तर हे ३ सिनेमे तुम्ही नक्कीच पाहिले पाहिजेत जे युट्यूबवर अगदी फ्री आहेत.

माधुरीच्या 'मिसेस देशपांडे'चे फॅन आहात? मग हे थ्रिलर साऊथ सिनेमे युट्यूबवर एकदा पाहाच; चक्रावून जाल
सध्या माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा आहे. ही एक अॅक्शन थ्रिलर सस्पेन्स वेब सीरिज असून या वेब सीरिजमध्ये माधुरी दीक्षितने एका सिरियल किलरची भूमिका साकारली आहे. 'मिसेस देशपांडे' वेब सीरिजचं कथानक, त्यातील एकामागोमाग एक उलगडत जाणारी रहस्य तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. जर तुम्हाला 'मिसेस देशपांडे' ही वेब सीरिज आवडली असेल आणि अशा थ्रिलर सस्पेन्स वेब सीरिजचे तुम्ही चाहते असाल तर हे ३ सिनेमे तुम्ही नक्कीच पाहिले पाहिजेत जे युट्यूबवर अगदी फ्री आहेत.
'पोलीस स्टोरी २'
हा एक साऊथ सिनेमा आहे. साऊथ सिनेमा नेहमीच अॅक्शन आणि थ्रिलरसाठी ओळखला जातो. पण, या सिनेमांमधील सस्पेन्सही जबरदस्त असतो. 'पोलीस स्टोरी २' सिनेमात पोलिसांना एका मृतदेहाचा सांगाडा मिळतो. पण यामध्ये फक्त डोक्याच्या कवटीचा सांगाडा असतो. तो सांगाडा एका मुलीचा आहे हे मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट होतं. ती व्यक्ती कोण आहे याचा पोलीस शोध घेत असतात. तर दुसरीकडे या कथानकात एका पत्रकाराचीही कथा आहे. ज्याला त्याच्या घरात काही विचित्र गोष्टी घडताना दिसतात. या सिनेमात तुम्हाला थ्रिलर आणि सस्पेन्ससोबतच हॉररही अनुभवायला मिळेल.

पोलीस स्टोरी
अंजाम पथिरा हा साऊथ सिनेमा हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे. ज्याचं नाव पोलीस स्टोरी असं आहे. हा सिनेमा काहीसा मिसेस देशपांडे सीरिजसारखा आहे. सिनेमात एक सिरियल किलर एका मागोमाग एक खून करतो. हे सर्व खून पोलीस अधिकाऱ्यांचे असतात. जे अत्यंत नियोजनबद्ध आणि निदर्यी पद्धतीने सूड भावनेतून केलेले असतात. त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरते. खून झाल्यानंतर त्या मृतदेहाच्या बाजूला न्यायदेवताची मूर्ती ठेवलेली असते. सिरियल किलरची मानसिकता समजण्यासाठी अनवर हुसेन नावाच्या क्रिमिनल सायकोलॉजिस्टची मदत होते. तपासातून उघड होते की पोलिसांच्या काही चुकांमुळे भूतकाळात काही निरपराध सामान्य लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. त्याचाच बदला घेण्यासाठी सिरीयल किलर हे खून करत असतो. पण, कथेच्या शेवटी एक धक्कादायक सत्य समोर येतं. ज्यामुळे तुम्ही हादरून जाल. सस्पेन्स, खिळवून ठेवणारी आणि विचार करायला लावणारी कथा आणि जबरदस्त थ्रिलर यासाठी हा सिनेमा नक्की पाहा.

अदृश्यम
अदृश्यम हादेखील एक साऊथ सिनेमा आहे. जो हिंदीमध्ये भाषांतरित केला आहे. हा देखील एक क्राइम थ्रिलर ड्रामा आहे. या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक मुलगी गायब होताना दिसते. तिला शोधण्याच्या मिशनवरच या सिनेमाची कथा आहे. सिनेमात गुप्त सुरक्षा यंत्रणेसाठी काम करत असलेला एक अधिकारी दाखवण्यात आला आहे. या मुलीला शोधताना त्याला अशा काही मोठ्या कटाचा सुगावा लागतो ज्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. सस्पेन्स थ्रिलरसाठी हा सिनेमा अवश्य पाहायला हवा.