सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली लॉटरी, दाक्षिणात्य चित्रपटात धडाकेबाज एन्ट्री, तुम्ही ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 01:48 PM2023-10-21T13:48:58+5:302023-10-21T13:49:13+5:30

मराठी अभिनेता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात, तेलुगु सिनेमातील लूक आला समोर

marathi actor devdutta nage to seen in telugu south movie shared poster | सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली लॉटरी, दाक्षिणात्य चित्रपटात धडाकेबाज एन्ट्री, तुम्ही ओळखलं का?

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली लॉटरी, दाक्षिणात्य चित्रपटात धडाकेबाज एन्ट्री, तुम्ही ओळखलं का?

'जय मल्हार' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. पिळदार शरीरयष्टी आणि दमदार अभिनय साकारुन देवदत्त नागेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. 'जय मल्हार' मालिकेत खंडोबाच्या भूमिकेने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. या मालिकेनंतर देवदत्त नागेने चित्रपटांतही विविधांगी भूमिका साकारल्या. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही देवदत्तने अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं. आता देवदत्त दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. दाक्षिणात्य सिनेमातून देवदत्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

देवदत्त तेलुगु चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवरुन या सिनेमातील त्याच्या लूकचं पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटात देवदत्त कामसाराजू हे पात्र साकारताना दिसणार आहे. गळ्यात रुद्राक्षच्या माळा आणि हातात शस्त्र असलेला देवदत्तचा लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. केस आणि वाढलेल्या दाढीमध्ये देवदत्त अगदी राऊडी दाक्षिणात्य हिरोसारखा दिसत आहे. देवदत्तच्या या चित्रपटाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. पण, लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष' चित्रपटात देवदत्त हनुमानाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने 'तान्हाजी', 'सत्यमेव जयते' या बॉलिवूड चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'जय मल्हार' मालिकेनंतर 'डॉक्टर डॉन' आणि 'जीव माझा गुंतला' या मालिकांमध्ये देवदत्त झळकला होता. 

Web Title: marathi actor devdutta nage to seen in telugu south movie shared poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.