राम चरणच्या 'पेड्डी'मध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, साऊथ सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:52 IST2026-03-27T15:52:00+5:302026-03-27T15:52:33+5:30

'पेड्डी' सिनेमाची छोटी झलक राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांच्या भेटीला आली आहे. यामध्ये राम चरणता पैलवान लूक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. पण, 'पेड्डी' सिनेमाच्या या टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलं ते मराठी अभिनेत्याने. 

marathi actor ankit mohan to play important role in ram charan south movie peddi pehlwan | राम चरणच्या 'पेड्डी'मध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, साऊथ सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

राम चरणच्या 'पेड्डी'मध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, साऊथ सिनेमात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

साऊथ स्टार राम चरण त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. राम चरण 'पेड्डी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम चरणचा आज वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी राम चरणने चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. 'पेड्डी' सिनेमाची छोटी झलक राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांच्या भेटीला आली आहे. यामध्ये राम चरणता पैलवान लूक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. पण, 'पेड्डी' सिनेमाच्या या टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलं ते मराठी अभिनेत्याने. 

राम चरणच्या 'पेड्डी' सिनेमात मराठी अभिनेत्याची वर्णी लागली आहे. मराठी अभिनेताअंकित मोहन या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'पेड्डी' सिनेमाच्या टीझरमध्ये अंकित मोहनची झलक दिसली आहे. या टीझरमध्ये राम चरण कुस्तीच्या आखाड्यात दिसत आहे.त्याच्यासोबत कुस्ती खेळताना दुसरा एक पैलवान दिसत आहे. हा पैलवान दुसरा तिसरा कोणी नसून अंकित मोहन आहे. अंकितला साऊथ सिनेमात राम चरणसोबत स्क्रीन शेअर करताना पाहून चाहते आनंदी झाले आहेत. 

'पेड्डी' सिनेमात राम चरण मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत जान्हवी कपूर, शिवा राजकुमार, दिव्येंदु शर्मा आणि जगपति बाबू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. बुची बाबू सना यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार झाला आहे. वेंकट सतीश किलारू यांनी त्यांच्या वृद्धी सिनेमाज या बॅनरखाली आणि प्रमुख निर्मिती संस्था मिथ्री मूवी मेकर्स यांच्या सहकार्याने तयार केलेला हा चित्रपट ३० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title : राम चरण की 'पेड्डी' में मराठी अभिनेता, महत्वपूर्ण भूमिका में दिखेंगे।

Web Summary : राम चरण की 'पेड्डी' में मराठी अभिनेता अंकित मोहन महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे। टीज़र में अंकित राम चरण के साथ पहलवान के रूप में दिख रहे हैं। फिल्म 30 अप्रैल, 2026 को रिलीज होगी।

Web Title : Marathi actor enters Ram Charan's 'Peddi', plays important role.

Web Summary : Ram Charan's 'Peddi' features Marathi actor Ankit Mohan in a key role. The teaser reveals Ankit as a wrestler alongside Ram Charan. The film releases April 30, 2026.