दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडेची क्रेझ! 'मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन'ने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 22:59 IST2023-09-12T22:59:25+5:302023-09-12T22:59:51+5:30

Lokmat Most Stylish Award 2023 : दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे यंदाची मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन ठरली. पूजाला लोकमत मोस्ट स्टायलिस्ट युथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

lokmat msa 2023 South actress Pooja Hegde felicitated with Most Stylish Youth Icon award | दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडेची क्रेझ! 'मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन'ने गौरव

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडेची क्रेझ! 'मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन'ने गौरव

दरवर्षी लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान केला जातो. यंदा हा सोहळा मुंबईतील सेंट रेजिस येथे मंगळवारी(१२ सप्टेंबर) पार पडला. कलाविश्वातील अनेक सितारे लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरलेले दिसले. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लोकमच्या अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. मुंबईतील सेंट रेजिस येथे हा अवॉर्ड सोहळा पार पडला.

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे यंदाची मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन ठरली. पूजाला लोकमत मोस्ट स्टायलिस्ट युथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुजाने या अवॉर्ड सोहळ्यासाठी ग्लॅमरस लूक केला होता.

पूजा हेगडे ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पूजाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केलं आहे. ‘राधे श्याम’, ‘महर्षि’, ‘बीस्ट’ यांसारख्या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरलेल्या. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातही पूजा झळकली होती. याबरोबरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात पूजा मुख्य भूमिकेत होती.

Web Title: lokmat msa 2023 South actress Pooja Hegde felicitated with Most Stylish Youth Icon award