'टॉक्झिक' सिनेमात दिसणार होती कियारा अडवाणी, अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमुळे यशने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:13 IST2025-06-18T16:12:57+5:302025-06-18T16:13:31+5:30

कियाराच्या हातून 'डॉन ३' गेल्याची चर्चा असतानाच आता 'टॉक्झिक'बद्दल अपडेट आलं आहे.

Kiara Advani was to be seen in the movie Toxic actor Yash took a big decision due to the actress s pregnancy | 'टॉक्झिक' सिनेमात दिसणार होती कियारा अडवाणी, अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमुळे यशने घेतला मोठा निर्णय

'टॉक्झिक' सिनेमात दिसणार होती कियारा अडवाणी, अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीमुळे यशने घेतला मोठा निर्णय

अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani)  आई होणार आहे. काही महिन्यांनी तिच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. कियाराने प्रेग्नंसीतच कान्स रेड कार्पेटवर पदार्पण केलं. तिच्या  लूकचं खूप कौतुक झालं. कियाराच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसून येत होता. पती सिद्धार्थ मल्होत्राही तिची काळजी घेण्यासाठी कान्सला गेला होता. दरम्यान प्रेग्नंसीमुळे कियाराच्या हातून मोठा सिनेमा गेला. 'डॉन ३' मध्ये कियारा रणवीर सिंहच्या अपोझिट दिसणार होती. मात्र आता क्रिती सेननने तिला रिप्लेस केलं असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे कियारा यशच्या 'टॉक्झिक' सिनेमातही दिसणार होती. याबद्दल यशने आता मोठा निर्णय घेतला आहे ज्याचं कौतुक होतंय.

साऊथ अभिनेता यश (Yash) सध्या 'रामायण' आणि 'टॉक्झिक' या दोन्ही सिनेमांमुळे चर्चेत आहे. 'टॉक्झिक' मध्ये तो कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. यश त्याच्या चांगल्या स्वभावामुळेही लोकप्रिय आहे. त्याच्या मनाचा मोठेपणा पुन्हा दिसून आला आहे. टॉक्झिक चे दिग्दर्शक गीतू मोहनदास आणि निर्माते वेंकट के नारायण यांनी सिनेमाच्या शूटिंगचे सर्व फॉर्मॅलिटी बंगळुरुतून मुंबईला शिफ्ट केले आहे. कियाराच्या सोयीसाठीच त्यांनी हा निर्णय घेतला. यशनेही सहकार्य केलं. यामुळे निर्मात्यांचेही बरेच पैसे वाचले. 

सिद्धार्थ आणि कियाराने मार्च महिन्यात प्रेग्नंसीची घोषणा केली होती. सध्या दोघंही आयुष्याच्या या नव्या टप्प्यासाठी सज्ज आहेत. कियारा अडवाणी  'वॉर २'मध्येही दिसणार आहे. सिनेमातील तिचा बिकीनी लूक नुकताच व्हायरल झाला. तर सिद्धार्थ मल्होत्रा आगामी 'परम सुंदरी' सिनेमात जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे. 

Web Title: Kiara Advani was to be seen in the movie Toxic actor Yash took a big decision due to the actress s pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.