Kantara Chapter 1: ८ दिवसांतच ५०० कोटी! ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:21 IST2025-10-10T17:21:35+5:302025-10-10T17:21:57+5:30
'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर 'कांतारा: चॅप्टर १' कोटींमध्ये कमाई करत आहे.

Kantara Chapter 1: ८ दिवसांतच ५०० कोटी! ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर हवा
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: चॅप्टर १' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुंवा उडवला आहे. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या सुपरहिट सिनेमाचा 'कांतारा: चॅप्टर १' हा प्रीक्वल आहे. 'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर 'कांतारा: चॅप्टर १' कोटींमध्ये कमाई करत आहे.
'कांतारा: चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. अवघ्या ८ दिवसांतच ऋषभ शेट्टींच्या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. 'कांतारा: चॅप्टर १'ने आठवड्याभरात देशात ३०० कोटींचा टप्पा पार केला होता. आठ दिवसांत या सिनेमाने ३३७.४ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात ५०९ कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान 'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा कन्नडसह हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही ऋषभ शेट्टीने केलं आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर 'कांतारा: चॅप्टर १' प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्या दिवसापासूनच सिनेमा बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे.