प्रतीक्षा संपली; ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' आता OTT वर हिंदीमध्ये रिलीज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:45 IST2025-11-27T14:08:44+5:302025-11-27T14:45:43+5:30
'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट हिंदी भाषेत ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

प्रतीक्षा संपली; ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' आता OTT वर हिंदीमध्ये रिलीज!
Kantara: A Legend Streaming On OTT: 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटात ऋषभ शेट्टीशिवाय, बहुमुखी अभिनेते गुलशन देवैया आणि रुक्मिणी वसंत देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदीमध्ये ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार? असा प्रश्न अनेकांना प्रेक्षकांच्या पडला होता. आता हा चित्रपट हिंदी भाषेत ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
'कांतारा चॅप्टर १' हा मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्ये ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचं हिंदी व्हर्जनदेखील ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरच आज २७ नोव्हेंबर रोजी स्ट्रीम झालं आहे. याची घोषणा ॲमेझॉन प्राइम व्हिडीओच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्टर शेअर करत झाली आहे. त्यामुळे भारतातील आणि जगभरातील २०० हून अधिक देश आणि प्रदेशांमधील चाहते आता हा चित्रपट आपल्या आवडीच्या हिंदी भाषेत पाहू शकतील. अद्भुत अनुभव देणारा 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बॉक्स ऑफिसवर केली इतकी कमाई
'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ कन्नडमध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतात आणि जगभरात धुमाकूळ घालत एक नवा इतिहास रचला आहे. 'कांतारा'चा हा प्रीक्वल केवळ ब्लॉकबस्टर ठरला नाही, तर वर्षातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक बनला आहे. 'कांतारा चॅप्टर १'च्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, भारतात ६२१.८४ इतकी प्रचंड कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ९०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे, विकी कौशलच्या "छावा" ला मागे टाकत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.