अवघ्या २६व्या वर्षी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने आयुष्य संपवलं, काय होतं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:40 IST2025-12-30T09:38:50+5:302025-12-30T09:40:50+5:30
अवघ्या कमी वयात यश मिळवणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीने या कारणामुळे संपवलं जीवन, जाणून घ्या...

अवघ्या २६व्या वर्षी 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने आयुष्य संपवलं, काय होतं कारण?
Kannada Actress Cm Nandini News: कलाकार म्हटलं की संघर्ष आणि आव्हानं ही आलीच. काहींना व्यावसायिक आयुष्यात, तर काहींना खाजगी आयुष्यात याचा कधी ना कधी सामना करावा लागतोच. मात्र, आत्महत्या हा त्यावर पर्याय नव्हे. सध्या दाक्षिणात्य कलाविश्वातून अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कन्नड आणि तमिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री नंदिनी सीएम हिने वयाच्या २६ व्या वर्षी तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेमुळे मनोरंजन विश्व हादरून गेलं आहे. शिवाय नंदिनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अवघ्या कमी वयात यश मिळवणाऱ्या या अभिनेत्रीचा असा अंत झाल्याने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.अभिनेत्री नंदिनी सीएम ही बेंगळुरूच्या आरआर नगर परिसरातील एका पेइंग गेस्ट निवासस्थानी ती मृतावस्थेत आढळून आली.धक्कादायक गोष्ट म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी अभिनेत्रीने सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने आपल्यावर अभिनय क्षेत्र सोडून सरकारी नोकरी करण्याचा दबाव टाकण्यात येत होता, असं लिहिल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सदर घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
नंदिनी कन्नड आणि तमिळ मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'जीवा हूवागिदे', 'संघर्ष' आणि 'गौरी' यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. नंदिनी मूळची बेल्लारीची होती. तिने आपलं शिक्षण तिथेच पूर्ण केलं आणि नंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी ती बंगळुरूला आली, परंतु अखेरीस तिने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.