रजनीकांत यांनी हात मिळवला तेव्हा असं वाटलं की...; 'जवान'मधल्या 'लक्ष्मी'नं सांगितला भारी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 10:44 AM2023-12-20T10:44:50+5:302023-12-20T10:48:52+5:30

'जवान'मधली लक्ष्मीही रजनीकांत यांची मोठी फॅन आहे.

Jawan fame actress priyamani share her experience with superstar rajinikanth | रजनीकांत यांनी हात मिळवला तेव्हा असं वाटलं की...; 'जवान'मधल्या 'लक्ष्मी'नं सांगितला भारी अनुभव

रजनीकांत यांनी हात मिळवला तेव्हा असं वाटलं की...; 'जवान'मधल्या 'लक्ष्मी'नं सांगितला भारी अनुभव

'द फॅमिली मॅन' आणि आता 'जवान' सिनेमामुळे चर्चेत असलेली साऊथ अभिनेत्री प्रियामणिने (Priyamani) आपल्या अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलंय. १० वर्षांपूर्वी तिने शाहरुख खानच्याच 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमात 'वन टू थ्री फोर..' हे आयटम साँग केले होते. आता ती शाहरुख सोबत 'जवान' मध्ये दिसली होती. नुकतंच तिने ती रजनीकांत यांची मोठी फॅन असल्याचं सांगितलं आहे.   

एकदा अचानक थलायवा तिच्या सेटवर पोहोचले होते, त्याना पाहून अभिनेत्रीचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रियामणिने सांगितलं ती 'जवान' सिनेमातील जिंदा बंदा या गाण्याचे शूटिंग करत होती. तिथे जवळच्या सेटवर रजनीकांत सर त्यांच्या 'जेलर' सिनेमाचे शूटिंग करत होते. दोनही सिनेमाचे सेट जवळ असल्यामुळे रजनीकांत या सेटवर येऊ शकतात असं तिलं कळलं होते. प्रियामणि सांगते, रजनीकांत सर सेटवर आलं आणि त्यांनी सगळ्यांना पाहिलं. मी त्यांना पाहून तर काहीक्षण स्तब्ध झाले होते.     
 
रजनीकांत यांनी प्रियामणिशी हात मिळवत तिची विचारपूस केली. यानंतर अभिनेत्रीने आपल्या हातांकडे पाहिले आणि तिला वाटलं आता मी माझा हात धुणारच नाही. खरंतर रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित नाही. विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. थलायवी या नावाने खासकरुन ओळख निर्माण करणाऱ्या रजनीकांत यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देवासमान मानलं जातं. त्यामुळेच प्रियामणिही थलावयाला भेटल्यानंतर भारावून गेली होती.

Web Title: Jawan fame actress priyamani share her experience with superstar rajinikanth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.