रजनीकांत यांचा 'जेलर' बॉक्स ऑफिसवर सुसाट, २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल, सहा दिवसांत केली जबरदस्त कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:40 AM2023-08-16T10:40:28+5:302023-08-16T11:17:26+5:30

10 ऑगस्ट रोजी रजनीकांत यांचा 'जेलर' हा सिनेमा रिलीज झाला. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

Jailer box office collection day 6 rajinikanth movie crosses 200 crore on 15 august | रजनीकांत यांचा 'जेलर' बॉक्स ऑफिसवर सुसाट, २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल, सहा दिवसांत केली जबरदस्त कमाई

रजनीकांत यांचा 'जेलर' बॉक्स ऑफिसवर सुसाट, २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल, सहा दिवसांत केली जबरदस्त कमाई

googlenewsNext

गेल्या अनेक महिन्यांपासून चाहते सुपरस्टार रजनीकांत यांच्या जेलरची वाट पाहत होते. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली. जेलरच्या अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत रेकॉर्डब्रेक कमाई केली. सुपरस्टार रजनीकांत यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की, त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीत लिजेंड का म्हणतात. 10 ऑगस्ट रोजी 72 वर्षीय रजनीकांत यांचा 'जेलर' हा सिनेमा रिलीज झाला. रिलीज होताच या चित्रपटाने धुमाकूळ घातला. आता सहाव्या दिवसाचे या सिनेमाचे कलेक्शन समोर आलं आहे. 

रजनीकांत यांचा चाहतावर्ग किती मोठा आहे, हे त्यांच्या 'जेलर' चित्रपटाच्या सहा दिवसांच्या कमाईवरुन दिसून येईल. चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त भारतात 48 कोटींची कमाई केली होती.दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई कमी झाली होती आणि तिसऱ्या दिवशी 25.75 कोटी, 34 कोटी कमावले. तीन दिवसांत या चित्रपटाने 108 कोटींचा गल्ला जमावला होता.  जगभरातील सिनेमागृहांमध्ये जेलर धुमाकूळ घालतो हे याचे आकडे सांगतायेत. 

 सहा दिवसांत हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. तमिळनाडूसोबतच केरळ, कर्नाटक आणि आंध्र-तेलंगणात चित्रपट खूप चालतोय. वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर नजर टाकली तर रजनीकांत यांच्या 'जेलर'ने तगडी कमाई केली आहे.भारतात २०० कोटींची गल्ला जमावणारा जेलरची वर्ल्डवाइड कमाई ४०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होण्याची शक्यता आहे. 

जेलरबद्दल बोलायचं तर ही गोष्ट आहे एका वडील आणि मुलाची. या चित्रपटात रजनीकांत एका निवृत्त जेलरच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांचा मुलगा पोलिस अधिकारी आहे. त्याच्या मुलाचा खून होतो आणि त्यानंतर तो त्या मारेकऱ्यांना मारण्याचा प्लान आखतो.जेलरमध्ये सुपरस्टार रजनीकांत व्यतिरिक्त शिव राजकुमार, मिर्ना मेनन, तमन्ना भाटिया, मोहनलाल आणि वसंत रवी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 

Web Title: Jailer box office collection day 6 rajinikanth movie crosses 200 crore on 15 august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.