बॉक्स ऑफिसरवरील थलाइवाची जादू कायम, २ दिवसात रजनीकांत यांच्या जेलरनं कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 03:58 PM2023-08-12T15:58:04+5:302023-08-12T16:05:04+5:30

अपेक्षेप्रमाणे जेरलने प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचून आणली. आता दोन दिवसांत या सिनेमाने किती गल्ला जमावला याचा आकडा समोर आला आहे.

Jailer box office collection day 2 rajinikanth jailer magic in 2 days as film collects above 75 crore | बॉक्स ऑफिसरवरील थलाइवाची जादू कायम, २ दिवसात रजनीकांत यांच्या जेलरनं कमावले इतके कोटी

बॉक्स ऑफिसरवरील थलाइवाची जादू कायम, २ दिवसात रजनीकांत यांच्या जेलरनं कमावले इतके कोटी

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. सिनेमा रिलीज होताच चाहत्यांनी थिएटरबाहेर धुमाकूळ घातला. रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी तर ते देवच आहेत. साऊथमध्ये अनेक ठिकाणी रजनीकांत यांना पूजतात. दोन वर्षांपासून रजनी यांचे चाहते त्यांच्या चित्रपटाची वाट पाहत होते. अपेक्षेप्रमाणे सिनेमाने प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचून आणली. दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईचा आकडा समोर आला आहे.

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या मते,  जेलरने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 48. 35 कोटींची कमाई केली आहे तर दुसऱ्या दिवशी  27 कोटींची.  दोन दिवसांत या सिनेमाने जवळपास 75.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्याच दिवशी जेलरने जगभरात 72 कोटींचा गल्ला जमावला आहे. 

 200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या जेलरमध्ये सुपरस्टार रजनीकांत व्यतिरिक्त शिव राजकुमार, मिर्ना मेनन, तमन्ना भाटिया, मोहनलाल आणि वसंत रवी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. दोन मराठी कलाकांरानी ही या सिनेमात काम केलं आहे. गिरीश कुलकर्णीने सिनेमात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर मकरंद देशपांडे सिनेमात गुंड आहेत. जेलमध्ये रजनी त्यांना धडा शिकवतो. तर नंतर तेच रजनीची मदत करताना दिसतात.  या चित्रपटातील गाण्याची सध्या खूप चर्चा होत आहे. त्याचबरोबर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही अनेक विक्रम केले आहेत. शनिवार आणि रविवारमध्ये कमाईच्या आकड्यांमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Jailer box office collection day 2 rajinikanth jailer magic in 2 days as film collects above 75 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.