'पुष्पा' चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमारच्या घरावर आयकर विभागाचा छापा, घेतले ताब्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:07 IST2025-01-22T16:05:41+5:302025-01-22T16:07:00+5:30
IT Raid on Pushpa Director : दिग्दर्शक सुकुमारला हैदराबाद विमानतळावरुन ताब्यात घेतले.

'पुष्पा' चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमारच्या घरावर आयकर विभागाचा छापा, घेतले ताब्यात...
IT Raid on Pushpa Director : अभिनेता अल्लु अर्जून काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. आता 'पुष्पा 2' चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार अडचणीत आले आहेत. सुकुमार यांच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज(22 जानेवारी) छापा टाकला. छाप्यादरम्यान सुकुमार घरी नव्हते, त्यांना हैदराबाद विमानतळावरुन पकडण्यात आले. दरम्यान, या छापेमारीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
कर चोरीचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर अधिकाऱ्यांना त्याच्यावर करचुकवेगिरीचा संशय आहे. सध्या सुकुमार यांच्या घर आणि कार्यालयातील विविध कागदपत्रे तपासली जात आहेत. दरम्यान, या छापेमारीत काय सापडले, याचा खुलासा अद्याप अधिकाऱ्यांनी केला नाही. याशिवाय, सुकुमारनेही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नाही.
चित्रपटाच्या निर्मात्यावरही छापेमारी
विशेष म्हणजे, काल(21 जानेवारी) पुष्पा चित्रपटाचा निर्माता दिल राजूच्या मालमत्तेवरही आयकर छापे टाकले आहेत. दिल राजू तेलुगु सिनेमातील सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहेत. ते श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स या निर्मिती संस्थेचे मालक आहेत.
'पुष्पा 2' ची बंपर कमाई
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाने 1500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नासह फहाद फासिल, सुनील, राव रमेश या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.