"११ कोटींची मदत कर २०० कोटी देतो...", लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याकडून फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:28 IST2026-01-30T18:27:43+5:302026-01-30T18:28:07+5:30

लोकप्रिय अभिनेत्रीने एकाला ११.५० कोटींचा गंडा घातला आहे. २०० कोटींचं आमिष दाखवून अभिनेत्री आणि तिच्या पतीने एका व्यक्तीकडून ११.५० कोटी उकळले. याप्रकरणी अभिनेत्री आणि तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

fir filed against bhojpuri actress akanksha avasthi and her husband for cheating 11.50cr | "११ कोटींची मदत कर २०० कोटी देतो...", लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याकडून फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल

"११ कोटींची मदत कर २०० कोटी देतो...", लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याकडून फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल

सिनेइंडस्ट्रीतून खळबळजनक बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्रीने एकाला ११.५० कोटींचा गंडा घातला आहे. २०० कोटींचं आमिष दाखवून अभिनेत्री आणि तिच्या पतीने एका व्यक्तीकडून ११.५० कोटी उकळले. याप्रकरणी अभिनेत्री आणि तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा कारनामा भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थी आणि तिचा पती विवेक उर्फ अभिषेक कुमार चौहान यांनी केला आहे. 

आकांक्षा आणि तिच्या पतीने ५२ वर्षीय व्यावसायिक हितेश कांतिलाल अजमेरा यांची कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबईतील घाटकोपरमधील पंतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षा आणि तिच्या पतीने हितेश यांना २०० कोटींचं आमिष दाखवून त्यांच्याकडून ११.५० कोटी उकळले. स्वत:चा फिल्म स्टुडिओ आणि कलाकारांचं ट्रेनिंग सेंटर असल्याचंही त्यांनी हितेश यांना सांगितलं होतं. बिहारमधील एका गोदामात ३०० कोटी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र काही कायदेशीर अडचणी आणि गोदामाचं भाडं रखडल्याने ती रक्कम अडकल्याच म्हणत त्यासाठी ११.५० कोटी त्यांनी हितेश यांच्याकडून घेतले. तुम्ही मदत केली तर पैसे लवकरात लवकर परत केले जातील, असंही त्यांना अभिनेत्रीकडून सांगण्यात आलं होतं. 

हितेश यांनी तक्रारीत म्हटल्यानुसार, मार्च ते जुलै २०२४ च्या दरम्यान आकांक्षा आणि तिच्या पतीने २०२४ मध्ये ११.५० कोटी हितेश यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेतले होते. हितेश यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी पटनाला घेऊन जात त्यांना कागदपत्रही दाखवली होती. पण, ५ जुलैनंतर त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. सुरुवातीला आरोपींकडून कारणं दिली गेली. मात्र नंतर त्यांनी फोनच बंद केल्याने संपर्कच होऊ शकला नाही. 

Web Title : अभिनेत्री और पति पर 11.5 करोड़ की धोखाधड़ी का आरोप, मामला दर्ज।

Web Summary : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा अवस्थी और उनके पति पर एक व्यापारी से 11.5 करोड़ रुपये की धोखाधड़ी का आरोप है, 200 करोड़ रुपये का वादा किया गया था। मुंबई में दंपति के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज की गई है, आरोप है कि उन्होंने हितेश अजमेरा को फिल्म स्टूडियो और प्रशिक्षण केंद्र का वादा करके बिहार में फंसे धन का दावा किया।

Web Title : Actress, husband allegedly dupe businessman of ₹11.5 crore.

Web Summary : Bhojpuri actress Akanksha Awasthi and her husband allegedly defrauded a businessman of ₹11.5 crore by promising ₹200 crore returns. A police complaint has been filed in Mumbai against the couple for luring Hitesh Ajmera with promises of a film studio and training center, claiming funds were stuck in Bihar.