Video: काच फुटली, ओरखडे पडले! अतिउत्साही फॅन्सकडून विजयच्या गाडीचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:03 PM2024-03-19T13:03:06+5:302024-03-19T13:04:44+5:30

अतिउत्साही फॅन्सनी विजयला घेरलं, गाडीचं मोठं नुकसान! धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Excited fans surrounded thalapathy Vijay damage his car video viral | Video: काच फुटली, ओरखडे पडले! अतिउत्साही फॅन्सकडून विजयच्या गाडीचं मोठं नुकसान

Video: काच फुटली, ओरखडे पडले! अतिउत्साही फॅन्सकडून विजयच्या गाडीचं मोठं नुकसान

साऊथच्या अभिनेत्यांचं भारतात किती मोठं फॅन फॉलोईंग आहे हे काही वेगळं सांगायला नको. पण कधीकधी याच फॅन्समुळे अभिनेत्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. नुकतंच थलापती विजयच्या बाबतीत ही घटना घडली. अतिउत्साही फॅन्सनी विजयला घेरुन त्याच्या गाडीचं मोठं नुकसान केलंय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेमकं काय झालं सांगतो.

विजय त्याच्या आगामी 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' उर्फ ​​GOAT या चित्रपटाच्या शूटिंगसाठी 14 वर्षांनंतर केरळला परतला. विजय एअरपोर्टवरुन कारमध्ये बसताच त्याला चाहत्यांच्या प्रचंड गर्दीला सामोरं जावं लागलं. पण या अतिउत्साही फॅन्समुळे विजयच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं. त्रिवेंद्रममधील विजयसोबत घडलेल्या या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

विजयची एक झलक पाहण्यासाठी विमानतळाबाहेर फॅन्सची इतकी गर्दी झालेली की मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालं. चाहत्यांनी विजयच्या कारचं गंभीर नुकसान केलेलं दिसत आहे. कारच्या दरवाज्यांवर ओरखडे उमटले आहेत. याशिवाय कारच्या खिडक्यांच्या काचा फुटुन त्यांंचं नुकसान झालंय. ड्रायव्हरच्या सीटजवळ आणि कारच्या बाहेर काचेचे तुकडे पडलेले आहेत. अशाप्रकारे अतिउत्साही फॅन्सने विजयचं चांगलंच नुकसान केलेलं दिसतंय.

Web Title: Excited fans surrounded thalapathy Vijay damage his car video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood