'धुरंधर २'नंतर अर्जुन रामपालची साऊथच्या सिनेमात एन्ट्री, ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 11:39 IST2026-03-21T11:39:34+5:302026-03-21T11:39:56+5:30
अर्जुन रामपाल ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमात दिसणार आहे. या ऐतिहासिक सिनेमात अर्जुन महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

'धुरंधर २'नंतर अर्जुन रामपालची साऊथच्या सिनेमात एन्ट्री, ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात दिसणार
'धुरंधर २'मध्ये मेजर इकबालची भूमिका साकारून अभिनेता अर्जुन रामपाल चर्चेत आला आहे. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं कौतुकही होत आहे. 'धुरंधर २'नंतर अर्जुन रामपालला लॉटरी लागली आहे. मेजर इकबालची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन रामपालची साऊथच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे. अर्जुन रामपाल ऋषभ शेट्टीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमात दिसणार आहे. या ऐतिहासिक सिनेमात अर्जुन महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात अभिनेता ऋषभ शेट्टी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात शिवरायांची ऐतिहासिक पराक्रमाची गाथा मोठ्या पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. या सिनेमात अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन रामपाल 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. पण, त्याला ऐतिहासिक भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.
'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमाची स्टारकास्ट
'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिका आहे. अभिनेत्री शेफाली शाह राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अर्जुन रामपाल व्हिलन साकारणार आहे. संदी सिंह या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. २०२६ मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. बिग बजेट आणि भव्य दिव्य सिनेमाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. २०२७ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.