Kuberaa Review: रश्मिका, धनुष आणि नागार्जुनचा 'कुबेरा' पाहावा की नाही, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:04 IST2025-06-20T12:03:37+5:302025-06-20T12:04:29+5:30

'कुबेरा' प्रेक्षकांना आवडलाय की नाही? जाणून घ्या

Dhanush, Nagarjuna Star In Sekhar Kammula's Kuberaa X Reviews Users Says Its Too Long | Kuberaa Review: रश्मिका, धनुष आणि नागार्जुनचा 'कुबेरा' पाहावा की नाही, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट?

Kuberaa Review: रश्मिका, धनुष आणि नागार्जुनचा 'कुबेरा' पाहावा की नाही, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट?

बहुप्रतिक्षित चित्रपट 'कुबेरा'ची सध्या चर्चा सुरु आहे. या चित्रपटात धनुष, रश्मिका मंदाना आणि नागार्जुन हे मुख्य भुमिकेत आहेत. आज २० जून रोजी चित्रपटगृहांमध्ये 'कुबेरा' प्रदर्शित झाला आहे. 'कुबेरा' पाहिल्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. ट्विटरवर ट्वीट करत नेटकऱ्यांनी हा चित्रपट नेमका कसा आहे, हे सांगितलं आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी धनुषच्या दमदार अभिनयाचे कौतुक केले असून, चित्रपटाच्या लांबीवर मात्र थोडी नाराजी व्यक्त केली आहे.

एका एक्स (Twitter)  युजरनं लिहिलं, "धनुषचा अभिनय प्रभावी आहे. रश्मिकासोबत त्याची केमिस्ट्री अप्रतिम असून कथा उत्तम आहे, पण चित्रपट थोडा लहान असायला हवा होता, विशेषतः दुसऱ्या भागात वेग कमी जाणवतो".

आणखी एका युजरने तर धनुषच्या अभिनयाची प्रशंसा करत 'कुबेरा'ला त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम परफॉर्मन्स देणारा चित्रपट ठरवलं. तो म्हणाला, "चित्रपटाचा एकमेव दोष म्हणजे त्याची लांबी, पण त्यातील काही दृश्यं मनात कोरले जातात. संपूर्ण टीमने उत्तम काम केलं आहे".

एका युजरनं लिहिलं की, "कुबेरचा पहिला भाग प्रचंड पकड ठेवणारा आहे. चित्रपटाची कथा आधुनिक काळाशी सुसंगत आहे. धनुष, नागार्जुन आणि जिम सर्भ तिघांनीही आपापल्या भूमिका उत्कृष्ट साकारल्या आहेत. दोन दृश्यांमधून शेखर कमुलाचं दिग्दर्शन लख्खपणे जाणवतं".

Web Title: Dhanush, Nagarjuna Star In Sekhar Kammula's Kuberaa X Reviews Users Says Its Too Long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.