मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:18 IST2025-05-12T12:16:24+5:302025-05-12T12:18:35+5:30
लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडियन असलेल्या अभिनेत्याचं वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. नेमकं काय घडलं?

मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येतेय. प्रसिद्ध कन्नड अभिनेता आणि कॉमेडियन राकेश पूजारीचं (rakesh poojary) निधन झालंय. वयाच्या ३४ व्या वर्षी राकेशने अखेरचा श्वास घेतलाय. जवळच्या मैत्रिणीच्या मेहंदी सोहळ्याला गेलेल्या राकेशला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने राकेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज (१२ मे) सकाळी राकेशची प्राणज्योत मालवली. राकेश हा कन्नडमधील सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता होता. राकेशच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्...
अभिनेता शिवराज केआर पीटने राकेशच्या निधनाची दुःखद वार्ता सर्वांना सांगितली. राकेशला आरोग्याशी निगडीत कोणतीही समस्या नव्हती. ११ मे रोजी राकेश त्याच्या शहरात जवळच्या मैत्रिणीच्या मेहंदी सोहळ्याला गेला होता. तिथे त्याने सर्वांसोबत डान्स करुन आनंद साजरा केला. त्याचवेळी अचानक राकेशची तब्येत बिघडली. याशिवाय ब्लडप्रेशर कमी झाल्याने राकेशला हृदयविकाराचा झटका आला. राकेशच्या निधनाने कन्नड मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि राकेशच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
"ज्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिला अशा व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभो", अशा शब्दात शिवराजने राकेशला श्रद्धांजली वाहिली. राकेश हा कन्नड मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता होता. राकेशला 'कॉमेडी खिलाडी' या शोमधून खरी लोकप्रियता मिळाली. राकेशच्या मागे त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि छोटी बहीण आहे. राकेशच्या अकस्मात निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कॉमेडियन राकेशच्या निधनामुळे त्याचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.