'कांतारा-१'ची क्रेझ सोडा, ओटीटीवर ट्रेंड होतोय ऋषभ शेट्टीचा 'हा' गाजलेला सिनेमा; क्लायमॅक्स आणेल अंगावर काटा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:54 IST2025-10-09T13:50:18+5:302025-10-09T13:54:36+5:30
एकीकडे 'कांतारा-१' ची क्रेझ! ओटीटीवर ट्रेंड होतोय ऋषभ शेट्टीचा 'हा' गाजलेला सिनेमा; क्लायमॅक्स अंगावर काटा आणणारा

'कांतारा-१'ची क्रेझ सोडा, ओटीटीवर ट्रेंड होतोय ऋषभ शेट्टीचा 'हा' गाजलेला सिनेमा; क्लायमॅक्स आणेल अंगावर काटा!
Rishabh Shetty Movie: साऊथ सुपरस्टार ऋषभ शेट्टीची प्रमुख भूमिका असलेला 'कांतारा चॅप्टर-१' चित्रपटाची आता सगळीकडे चर्चा आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. २ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १२५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने फक्त ९ दिवसांत बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टीसह अभिनेत्री रुक्मिणी वसंत, गुलशन देवैय्या आणि जयराम या कलाकारांच्याही भूमिका आहेत. दरम्यान, एकीकडे इंडियन बॉक्स ऑफिसवर 'कांतारा चॅप्टर १' चा दबदबा असताना ओटीटीवर ऋषभ शेट्टीचा आणखी एका चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
साल २०२२ प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ओटीटीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. इतकंच नाही तर टॉप-१० मध्ये आपली जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर स्थान पक्क केलं आहे. अगदीच कमी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चौपट कमाई केली होती. या चित्रपटाचं नाव "कांतारा" आहे. कांतारा चॅप्टर १ चित्रपटाचा हा प्रीक्वल आहे. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
'कांतारा' हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला कन्नड भाषेतील अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखनही ऋषभ शेट्टीने केलं आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाने सुद्धा संपूर्ण भारतातील प्रेक्षकांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला होता. निसर्गाच्या सानिध्यात राहणारे, त्याची राखण करत देव म्हणून पूजा करणारे, त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या देवाची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे.