"KGFच्या सक्सेसआधी यश कोण होता?", अल्लू अर्जुनच्या वडिलांचं 'रॉकी भाई'बाबत वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 10:45 AM2023-11-09T10:45:50+5:302023-11-09T10:46:22+5:30

अल्लू अरविंद यांनी 'केजीएफ' स्टार यशबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

allu arjun father allu arvind said who is yash before kgf success | "KGFच्या सक्सेसआधी यश कोण होता?", अल्लू अर्जुनच्या वडिलांचं 'रॉकी भाई'बाबत वादग्रस्त वक्तव्य

"KGFच्या सक्सेसआधी यश कोण होता?", अल्लू अर्जुनच्या वडिलांचं 'रॉकी भाई'बाबत वादग्रस्त वक्तव्य

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्यमधील आघाडीचा अभिनेता आहे. अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंददेखील सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. अल्लू अरविंद हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. ते एक प्रसिद्ध निर्माता आहेत. पण सध्या ते एका वेगळाच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अल्लू अरविंद यांनी 'केजीएफ' स्टार यशबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

अल्लू अरविंद यांनी एका चित्रपटाच्या लॉन्च दरम्यान अभिनेता यशबाबत वक्तव्य केलं आहे. चित्रपटाच्या बजेटबाबत बोलताना त्यांनी फी वाढवणाऱ्या अभिनेत्यांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी यशबाबतही मोठं वक्तव्य केलं. "चित्रपट हिट झाल्यावर अभिनेते त्यांच्या मानधनात वाढ करतात. त्यामुळे चित्रपटाच्या बजेटमध्येही वाढ होऊन गडबड होते," असं ते म्हणाले. 

"यश 'केजीएफ' ब्लॉकबस्टर झाल्यानंतर पॅन इंडिया स्टार झाला. जो अभिनेता चित्रपटात मुख्य भूमिका साकरतो. त्याला चित्रपटाच्या २०-२५ टक्के मानधन मिळतं. पण, त्यामुळे चित्रपटाचं बजेट वाढतं असं म्हणता येणार नाही. चित्रपटात कोणते कलाकार आहेत, याने काहीच फरक पडत नाही. केजीएफआधी यश कोण होता? चित्रपट एवढा चर्चेत का होता? तो चित्रपट ज्या पद्धतीने बनवला गेला त्यामुळे तो हिट झाला. हे केवळ एक उदाहरण आहे. चित्रपटात अभिनेता कोणीही असो...अभिनेत्यामुळे नाही तर चित्रपटाच्या मेकिंगमुळे तो प्रेक्षकांना आकर्षित करतो," असं पुढे अल्लू अरविंद म्हणाले. 

'केजीएफ' स्टार यशबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अल्लू अरविंद चर्चेत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे यशचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली आहे. 

Web Title: allu arjun father allu arvind said who is yash before kgf success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.