"प्लेन क्रॅश होणार इतक्यात...", मृत्यूच्या दाढेतून परत आली 'ही' साऊथ क्वीन! सहप्रवासी अभिनेत्रीने सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:03 IST2025-11-10T13:59:47+5:302025-11-10T14:03:38+5:30
केवळ दैव बलवत्तर होते म्हणून वाचले! मृत्यूच्या दाढेतून परत आल्या 'या' नायिका, काय घडलेलं?

"प्लेन क्रॅश होणार इतक्यात...", मृत्यूच्या दाढेतून परत आली 'ही' साऊथ क्वीन! सहप्रवासी अभिनेत्रीने सांगितली आपबीती
Shraddha Das : 'सनम तेरी कसम', दिल तो बच्चा है जी, जिद, ग्रेट ग्रैंड मस्ती आणि 'आर्या 2' यांसारख्या चित्रपटांतून चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे श्रद्धा दास. बॉलिवूड ते साऊथ सिनेसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच, श्रद्धाने एका प्रवासादरम्यानचा थराथर प्रसंग शेअर केला. दरम्यान, दक्षिणेकडील आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील तिच्यासोबत होती, असं तिने सांगितंल. नेमकं काय घडलेलं जाणून घेऊया...
नुकत्याच 'फिल्मीग्यान' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रद्धाने त्या घटनेचा उल्लेख करत मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या विमानात पहिल्यांदा रश्मिकाला कशी भेटली, याबद्दल सविस्तर सांगितलं. मुंबईहून हैदराबादला प्रवास करत असताना अभिनेत्री श्रद्धा दास आणि रश्मिका मंदाना एकाच विमानाने प्रवास करत होत्या. पण, त्या विमानामध्ये काही बिघाड झाल्याने आपात्कालीन लॅंडिंग करावी लागली होती. त्यावेळी विमानामध्ये असलेल्या प्रत्येक प्रवाशाचा जीव टांगणीला लागला होता, आम्ही मृत्यू अगदी जवळून पाहिला होता, असा खुलासा अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला. तो भयावह अनुभव शेअर करत श्रद्धा म्हणाली, "रश्मिका आणि मला एकत्र असा अनुभव आला जिथे आमचे विमान जवळजवळ क्रॅश झालं असतं. ती आमची पहिली भेट होती. रश्मिका खूप गोड व्यक्ती आहे."
रश्मिकानेही केलेला खुलासा...
दरम्यान, ही घटना २०२४ साली घडली होती. यापूर्वी, रश्मिकाने देखील या जीवघेण्या घटनेचा उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्टद्वारे माहिती दिली होती. त्या घटनेबद्दल तिने सांगितलं होतं की, "तुमच्या माहितीसाठी, आज आम्ही अशा प्रकारे मृत्यूपासून वाचलो." रश्मिका आणि श्रद्धा दास मुंबईहून हैदराबादला प्रवास करत होत्या. उड्डाणादरम्यान, विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेने अभिनेत्रीला खूप धक्का बसला होता.
रश्मिका मंदानाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ही साऊथ क्वीन द गर्लफ्रेंड चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. तर अभिनेत्री श्रद्धा आर्या अलिकडेच सर्च द नैना मर्डर-केस या सीरिजमध्ये झळकली.