१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:06 IST2025-05-20T09:04:24+5:302025-05-20T09:06:35+5:30
मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री १२ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. इतकंच नव्हे त्यांनी लग्नाची तारीखही जाहीर केली आहे

१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री सई धंशिका. तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई धंशिका (sai dhanshika) आणि अभिनेता विशाल कृष्णा (vishal krishna) यांनी त्यांच्या विवाहाची अधिकृत घोषणा केली आहे. या दोघांनी 'योगी दा' या चित्रपटाच्या ऑडिओ लॉंच इव्हेंटमध्ये त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांनीच त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं आहे
विशाल आणि सई बांधणार लग्नगाठ
विशाल कृष्णा यांचे वय ४७ वर्ष असून तमिळ चित्रपटसृष्टीतील ते लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी 'मध गजा राजा' यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि तमिळ फिल्म प्रोड्यूसर्स कौन्सिलचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे. सई धंशिका ही 'कबाली' या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते, ज्यात तिने सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीची भूमिका केली होती. तिच्या अभिनय कौशल्यामुळे तमिळ चित्रपटसृष्टीतील तिला ओळख मिळाली आहे. सई आणि विशाल लग्न करणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.
सई आणि विशाल या दोघांच्या वयात सुमारे १२ वर्षांचं अंतर आहे. परंतु प्रेमाला वयाचं बंधन नसतं म्हणतात तेच खरं. अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु होती. आता विशाल आणि सई यांनी लग्नाची अधिकृत घोषणा केल्याने उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांनी विवाहाची घोषणा केल्यानंतर लग्नाची तारीखही सांगून टाकली. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सई आणि विशाल लग्न करणार आहेत.