Video: मतदान केंद्रावर विजय सेतुपतीने आजीबाईंसोबत केलेल्या 'या' कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 17:11 IST2024-04-19T17:10:52+5:302024-04-19T17:11:51+5:30

विजय सेतुपतीने मतदान केंद्रावर आजीबाईंना पाहिलं. पुढे विजयने आजीबाईंसोबत केलेल्या खास कृतीने सर्वांचं मन जिकलंय (vijay sethupati)

actor Vijay Sethupati action with his grandmother at the polling booth won the hearts of fans | Video: मतदान केंद्रावर विजय सेतुपतीने आजीबाईंसोबत केलेल्या 'या' कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन

Video: मतदान केंद्रावर विजय सेतुपतीने आजीबाईंसोबत केलेल्या 'या' कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन

विजय सेतुपती हा भारतातील लोकप्रिय अभिनेता. विजयने साऊथ इंडस्ट्री गाजवलीच शिवाय बॉलिवूडमध्येही 'जवान', 'मेरी ख्रिसमस' अशा सिनेमांमधून स्वतःची छाप पाडली. विजय सेतुपती कितीही मोठा अभिनेता असला तरीही त्याचं साधं राहणीमान चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतं. विजयच्या या साध्या स्वभावाचा नुकताच सर्वांना प्रत्यय आला. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला गेलेल्या आजीबाईंसोबत केलेल्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं.

विजयने आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. किलपौक येथील चेन्नई हायस्कूलमध्ये विजय मतदानाला गेला होता. त्यावेळी विजयने पाहिलं की वयस्कर आजीबाई मतदानासाठी व्हीलचेअरवर आल्या होत्या. त्यांना पाहताच विजय थांबला. विजयने त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेतला. याशिवाय खाली बसून त्यांच्यासोबत सेल्फीही घेतला. 

विजयने केलेल्या या छोट्याश्या कृतीने त्याच्या सर्व चाहत्यांचं मन जिंकलं. विजयचं केवळी राहणीमान नाही तर स्वभावही किती साधा आहे, याचा अनुभव सर्वांना आला. विजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. या वर्षात २०२४ मध्ये विजयचा कतरिना कैफसोबत 'मेरी ख्रिसमस' सिनेमा रिलीज झाला.  विजयच्या आगामी Yaavarum Vallavare, Viduthalai Part 2 आणि 'महाराजा' या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Web Title: actor Vijay Sethupati action with his grandmother at the polling booth won the hearts of fans