स्टेजवर परफॉर्मन्स करताना आला हृदयविकाराचा झटका, ४७ वर्षीय अभिनेता व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:10 IST2025-08-28T10:08:15+5:302025-08-28T10:10:56+5:30
एका ४७ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अभिनेत्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे

स्टेजवर परफॉर्मन्स करताना आला हृदयविकाराचा झटका, ४७ वर्षीय अभिनेता व्हेंटिलेटरवर, प्रकृती चिंताजनक
मनोरंजन विश्वातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. अभिनेते राजेश केशव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना एका रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अभिनेते राजेश केशव, ज्यांना ‘आरके’ या नावानेही ओळखले जाते, त्यांना कोचीमधील एका लाईव्ह इव्हेंटमध्ये परफॉर्म करत असताना हृदयविकाराचा झटका आला. ते स्टेजवरच कोसळले. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते ४७ वर्षांचे आहेत.
अँजिओप्लास्टी करण्यात आली
राजेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करताच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चित्रपट निर्माते प्रताप जयलक्ष्मी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, राजेश केशव सध्या कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नाहीये. मशीनच्या साहय्याने तो श्वास घेतोय, अशा शब्दात निर्मात्यांनी राजेश यांच्या चाहत्यांना ही दुःखद बातमी सांगितली आहे. काही रिपोर्ट्समध्ये असंही सांगण्यात येतंय, राजेश हॉटेलमधील बाथरुममध्ये बेशुद्ध होऊन कोसळला. परंतु याला दुजोरा देणारी अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
Famous Mollywood anchor #RajeshKeshav (RK) has been admitted to a private hospital ICU following a cardiac arrest 😥
— Southwood (@Southwoodoffl) August 24, 2025
His condition is currently stable, and we wish him a speedy recovery. pic.twitter.com/xozLTPyotS
डॉक्टरांनी सांगितले आहे की, राजेश हळूहळू त्यांच्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत. पण त्यांच्या मेंदूलाही मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचा संशय आहे. पुढील ७२ तास त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचे चाहते आणि मित्रमंडळी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या व्हेंटिलेटरच्या मदतीने राजेश यांना जीवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं, डॉक्टरांनी सांगितलं आहे. राजेश या गंभीर आजारातून लवकरात लवकर बरे होतील, अशी सर्वांना आशा आहे.