दक्षिणेतली ही अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आल्यास होईल भल्याभल्यांची सुट्टी
By Admin | Updated: March 3, 2017 22:05 IST2017-03-03T22:05:18+5:302017-03-03T22:05:18+5:30
हटके भूमिका, भडक अभिनय आणि भरपूर अंगप्रदर्शन करणाऱ्या दक्षिणेकडील अनेक अभिनेत्री तुम्हाला माहित असतीच

दक्षिणेतली ही अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आल्यास होईल भल्याभल्यांची सुट्टी
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 3 - हटके भूमिका, भडक अभिनय आणि भरपूर अंगप्रदर्शन करणाऱ्या दक्षिणेकडील अनेक अभिनेत्री तुम्हाला माहित असतीच. त्यातील अनेक अभिनेत्रीचे मानधन तर कोट्यवधीच्या घरात आहे, अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनुष्का शेट्टी. रुद्रम्मा देवी, बाहुबली अशा सुपरहिट चित्रपटात काम करणारी अनुष्का बॉलिवूडमध्ये आल्यास ती अनेक आघाडीच्या अभिनेत्रींची सुट्टी करू शकते.
दक्षिणेतील लेडी डॉन म्हणून ओळखली जाणारी अनुष्का एका चित्रपटासाठी तब्बल 5 कोटींपर्यंत मानधन घेते. मात्र ती कधीच जाहिरातीमधून काम करत नाही. तिला अनेक बॉलीवूड चित्रपटांसाठी ऑफर्स येत असतात, पण तिने आतापर्यंत अशा ऑफर्स धुडकावून लावल्या आहेत. दक्षिणेत तिची लोकप्रियता प्रचंड आहे. तिला प्रत्येक चित्रपटासाठी मागेल तेवढे मानधन देण्यास निर्माते तयार असतात. पण प्रचंड लोकप्रिय असलेली अनुष्का अजूनपर्यंत एकाही जाहिरातीत झळकलेली नाही. मात्र त्याचा तिच्या कमाईवर काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे ही सुद्धा कमालच म्हटली पाहिजे.