नीलिमा लोणारी दिग्दर्शित ‘आत्मा मालिक’ रूपेरी पडद्यावर

By Admin | Updated: November 1, 2015 02:11 IST2015-11-01T02:11:18+5:302015-11-01T02:11:18+5:30

चित्रपट म्हणजे समाजाचे प्रतिबिंब होय, त्यामुळेच आपल्या आसपास घडणाऱ्या घटना रूपेरी पडद्यावर चित्रित होताना दिसतात.

Soul owner directed by Neelima Lolithe on the silver screen | नीलिमा लोणारी दिग्दर्शित ‘आत्मा मालिक’ रूपेरी पडद्यावर

नीलिमा लोणारी दिग्दर्शित ‘आत्मा मालिक’ रूपेरी पडद्यावर

चित्रपट म्हणजे समाजाचे प्रतिबिंब होय, त्यामुळेच आपल्या आसपास घडणाऱ्या घटना
रूपेरी पडद्यावर चित्रित होताना दिसतात. आजवर अनेक देवी - देवतांना, संतांना धार्मिक आणि पौराणिक चित्रपटांद्वारे दिग्दर्शकांनी रूपेरी पडद्यावर सुंदरतेने सादर केले आहे. आता गुलदस्ता आणि चिनू यांसारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या शिवलीला फिल्म्स निर्मिती संस्थेंतर्गत निर्माता शिवम् लोणारी यांनी ‘आत्मा मालिक’ या हिंदी चित्रपटाची घोषणा नुकतीच शिर्डीजवळ कोपरगाव येथे असलेल्या प्रसिद्ध जंगलीदास महाराजांच्या आश्रमात केली. या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन नीलिमा लोणारी करणार आहेत. दिग्दर्शिका नीलिमा लोणारी सांगतात की, आत्मा मालिक हा काही पौराणिक चित्रपट नाही, वास्तव आणि आजची गोष्ट यात दर्शवण्यात येणार आहे. आठ महिन्यांत चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात येणार असून, या चित्रपटात बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांचा समावेश असणार आहे. देवी - देवतांवर अनेक चित्रपट आले आहेत, परंतु विश्वात्मक आणि व्यापक शक्ती म्हणून सिद्ध असलेल्या आत्म्यावर आधारित या चित्रपटामुळे प्रत्येक माणसाला त्याच्यातल्या आत्म्याची ओळख व्हावी हाच या चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे, असे परमानंद महाराज सांगतात.

Web Title: Soul owner directed by Neelima Lolithe on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.