कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी 'बिग बीं'नी लोकलमध्ये गायलं गाणं
By Admin | Updated: November 16, 2015 18:33 IST2015-11-16T18:33:07+5:302015-11-16T18:33:27+5:30
बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी सीएसटी ते भांडुप लोकल प्रवास करत गाणी गाून कॅन्सरग्रस्तांसाठी निधी गोळा केला.

कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी 'बिग बीं'नी लोकलमध्ये गायलं गाणं
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आपल्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सर्वज्ञात असून त्यांनी नुकताच सीएसटी ते भांडूप लोकलने प्रवास करून गाणी गात कॅन्सर पीडितांसाठी निधी गोळा केला. आपले प्रेरणास्थान असलेल्या, आवडत्या अभिनेत्याला चक्क लोकलमध्ये पाहून ट्रेनमधील प्रवाशांचा दिवस मात्र चांगलाच सार्थकी लागला.
कॅन्सर पीडितांसाठी काम करणारे, लोकलमध्ये गाणं गाणारे सौरभ निंमकर यांची मदत करण्यासाठी ७३ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भांडुप स्टेशनपर्यंत लोकलमधून प्रवास केला. तसेच निमकर यांच्यासह गाणीही म्हटली आणि कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बिग बींनी या प्रवासाबद्दल माहिती दिली आहे. 'सौरभची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. त्याच्यासोबत प्रवास करून तो (कॅन्सरग्रस्तांसाठी) जितकं काम करतं तितकं मीही करावं, असा विचार करून मी हा प्रवास केला' असे बिग बींनी नमूद केले आहे.